मुंबई हल्ल्याचा मास्टर माईंड हाफीज सईदच्या संघटनेवर पाकिस्तानची बंदी

मुंबई हल्ल्याचा मास्टर माईंड हाफीज सईदच्या संघटनेवर पाकिस्तानची बंदी

संयुक्त राष्ट्र संघानेही हाफीज सईदला पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषीत केलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 21 फेब्रुवारी : पुलवामा हल्ल्यानंतर भारताचा दबाव वाढल्याने पाकिस्तानने महत्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबईवरच्या हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफीज सईद याच्या 'जमात उल दवा' या संघटनेवर पाकिस्तान सरकारने बंदी घातली आहे. भारत आणि पाकिस्तानातल्या वाढत्या दबावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान इम्रान खान यांनी आज राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक बोलावली होती. त्यात हा निर्णय घेण्यात आला.

ISIचे प्रमुख, लष्करप्रमुख यांच्यासह महत्त्वाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. मुंबईवरच्या हल्ल्याची योजना हाफीज सईदनेच बनवली होती. डॉन या पाकिस्तानी वृत्तपत्राच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार फलाह-ए-इंसानियत या संघटनेवरही बंदी घालण्यात आली आहे. हाफीजची ही संघटना देणग्या गोळा करत असते.

या पैशाचा वापर हा दहशतवादी कारवायांसाठी केला जातो असा आरोप आहे. संयुक्त राष्ट्र संघानेही हाफीज सईदला पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषीत केलं आहे. त्याच्यावर 10 मिलिनियन डॉलरचं इनामही घोषीत करण्यात आलं आहे. त्यानंतर तातडीने त्याच्या संघटनेवर बंदी घालण्यात आली आहे.

पाकिस्तान कंगाल

राजकीय अस्थिरता आणि दहशतवादामुळे पाकिस्तानात विदेशी गुंतवणूक येत नाही. त्यामुळे उद्योग व्यवसाय ठप्प आहे. तर कमालीची गरीबी असल्याने करांमधूनही फार पैसे जमा होत नाही. त्यामुळे पाकिस्तानला विदेशी मदतीवर कायम अवलंबून राहावं लागतं. गेली अनेक दशक अमेरिकेच्या पैशावर आणि आता चीनच्या पैशावर पाकिस्तान आलेला दिवस काढतोय.

28 हजार अब्ज डॉलर्सचं कर्ज

पाकिस्तानातल्या 21 पैकी 7 कोटी जनतेकडे खायला पुरेसे अन्न नाही आणि प्यायला पाणीही नाही. प्रत्येक 10 पैकी चार नागरिकांना उपाशी पोटी राहावं लागतं. सरकारी तिजोरीतही खडखडाट आहे. 60 दिवस आयात होऊ शकेल एवढच विदेशी चलन पाकिस्तानकडे शिल्लक आहे. पाकिस्तानी रुपयांचं मुल्य आंतरराष्ट्रीय बाजारात संपलं असून एका डॉलरची किंमत 140 पाकिस्तानी रुपयांवर गेली आहे.

अमेरिकेची मदत नाही

9/11 च्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेचं पाकिस्तानविषयक धोरण बदलत गेलं. पाकिस्तानला मिळणारी कोट्यवधी डॉलर्सची मदत अमेरिकेने बंद केली. त्यामुळे पाकिस्तानला फटका बसला आणि त्याचा फायदा चीनने घेतला.

चीनची मदत

अमेरिकेशी दुरावा वाढल्याने पाकिस्तान चीनकडे वळला. प्रादेशिक सत्ता संतुलनासाठी चीनला हेच पाहिजे होतं. आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानला चीनने आर्थिक मदत केली. याच महिन्यात चीनने 17 हजार 750 कोटींची मदत केली. आत्तापर्यंत चीनने पाकिस्तानला 31 हजार 950 कोटींच कर्ज दिलं आहे. दुसऱ्या देशांनी दिलेलं कर्जाचे हफ्ते फेडण्याचीही ताकदही पाकिस्तानकडे नाही. ते हफ्ते फेडण्यासाठीही कर्ज घ्यावं लागतं. अशातच भारतासोबत संघर्ष झाला तर काय करायचं याची पाकिस्तानला चिंता आहे.

First published: February 21, 2019, 9:26 PM IST

ताज्या बातम्या