BREAKING पाकिस्तान हादरलं; क्वेट्टातल्या मशिदीत बॉम्बस्फोट, 14 ठार 21 जखमी

BREAKING पाकिस्तान हादरलं; क्वेट्टातल्या मशिदीत बॉम्बस्फोट, 14 ठार 21 जखमी

शुक्रवार असल्याने प्रार्थनेसाठी मशिदीत जास्त लोक होते. त्याचवेळी हा बॉम्बस्फोट झाल्याने मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जातेय.

  • Share this:

इस्लामाबाद 10 जानेवारी : मिशिदीत झालेल्या एका बॉम्बस्फोटाने पाकिस्तान आज हादरून गेलंय. बलुचिस्तानमधल्या एका मशिदीत हा भीषण बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात 14 जण ठार झाले तर 21 जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. मृतांमध्ये क्वेट्टाच्या पोलीस अधिक्षकांचाही समावेश आहे. शुक्रवार असल्याने प्रार्थनेसाठी मशिदीत जास्त लोक होते. त्याचवेळी हा बॉम्बस्फोट झाल्याने मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जातेय. सुरक्षा दलाने घटनास्थळाला वेढा टाकला असून शोध मोहिम सुरू असल्याचं पाकिस्तानच्या लष्करी प्रवक्त्याने सांगितलंय. बॉम्बस्फोट करणाऱ्यांना शोधून काढून असंही पाकिस्तान लष्कराच्या प्रवक्त्याने म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 10, 2020 09:36 PM IST

ताज्या बातम्या