मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

हमासच्या दहशतवाद्यांना पाकिस्तानकडून प्रशिक्षण, खासदाराकडून इम्रान सरकारची पोलखोल

हमासच्या दहशतवाद्यांना पाकिस्तानकडून प्रशिक्षण, खासदाराकडून इम्रान सरकारची पोलखोल

भारतामध्ये अशांततता निर्माण करण्यासाठी दहशतवाद्यांना सर्व प्रकारची मदत करणाऱ्या पाकिस्तान सैन्याने (Pakistan Army) आता आणखी एका देशात अशांतता निर्माण करण्यासाठी उद्योग सुरू केले आहेत.

  • Published by:  News18 Desk
इस्लामाबाद, 6 जून: भारतामध्ये अशांततता निर्माण करण्यासाठी दहशतवाद्यांना सर्व प्रकारची मदत करणाऱ्या पाकिस्तान सैन्याने (Pakistan Army) आता आणखी एका देशात अशांतता निर्माण करण्यासाठी उद्योग सुरू केले आहेत. पश्चिम आशियातील (West Asia) अशांत प्रदेश असलेल्या गाझा पट्टीमध्ये (Gaza) सक्रीय असलेल्या हमासच्या दहशतवाद्यांना (Hamas Terrorist) इस्रायल (Israel) विरुद्ध लढण्यासाठी पाकिस्तान सैन्य मदत करत आहे. पाकिस्तानच्या वरिष्ठ खासदाराने केलेल्या आरोपामुळे इम्रान खान (Imran Khan) सरकारची पोलखोल झाली आहे. पाकिस्तानमधील वरिष्ठ खासदार राजा जफर उल हक यांनी हा आरोप केला आहे. मी ट्यूनेशियामध्ये गेलो होतो त्यावेळी अबू जिहाद (खलीद अल वजीर) हे पॅल्टेस्टाईन नेते जिवंत होते. त्यांनी मला ही माहिती दिली. इस्रायल विरुद्ध संघर्ष झाला तर त्यांच्या विरोधात लढणाऱ्या बहुतेकांनी पाकिस्तानमध्ये लष्करी प्रशिक्षण घेतलेले असते, हा प्रकार अजूनही सुरु आहे.' अबू जिहाद हे गाझा परिसरातील फतह पक्षाचे सहसंस्थापक होते. पाकिस्तान सेनेच्या स्पेशल युनिटची एक बटालियन हे ट्रेनिंग सेंटर चालवण्यासाठी गाझामध्ये तैनात आहे, असा दावा देखील जफर यांनी केला आहे. कोण आहेत राजा जफर? हमास आणि पाकिस्तानमधील संबंधाचा गौप्यस्फोट करणारे राजा जफर उल हक हे पाकिस्तानच्या संसदेमधील खासदार आहेत. ते ऑगस्ट 2018 ते मार्च 2021 या काळात पाकिस्तानच्या संसदेमध्ये विरोधी पक्षनेता होते. इतकचं नाही तर त्यांनी पाकिस्तानचे माजी लष्करशहा झिया-उल-हक यांच्या राजवटीमध्ये इजिप्तमधील राजदूत म्हणून काम केले आहे. ते 1997 ते 1999 या काळात पाकिस्तानातील धार्मिक विभागाचे मंत्री होते. इतक्या अनुभवी आणि बड्या नेत्यानं केलेल्या आरोपामुळे इम्रान खान सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे. महिला खासदाराच्या कपड्यांवर सभापतींचा आक्षेप, संसदेतून काढलं बाहेर पाकिस्तानने अद्यापही इस्रायलला देश म्हणून मान्यता दिलेली नाही. त्यामुळे पाकिस्तानी नागरिक त्याच्या पासपोर्टच्या आधारे इस्रायलची यात्रा करु शकत नाही. इतकच नाही तर 'हा पासपोर्ट इस्रायल सोडून जगातील अन्य सर्व देशांमध्ये वैध आहे,' असेही त्यावर लिहिलेले असते.
First published:

Tags: Imran khan, Israel, Pakistan army

पुढील बातम्या