PM इमरान खान घाबरले; पाकिस्तान लष्कराबाबत घेतला मोठा निर्णय!

PM इमरान खान घाबरले; पाकिस्तान लष्कराबाबत घेतला मोठा निर्णय!

काश्मीर संदर्भात भारताने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयानंतर पाकचे पंतप्रधान इमरान खान यांनी लष्करासंदर्भात मोठा निर्णय घेतला.

  • Share this:

इस्लामाबाद, 19 ऑगस्ट: जम्मू-काश्मीर संदर्भात भारतातील मोदी सरकराने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयानंतर पाकिस्तान(Pakistan)मध्ये तणावाचे वातावरण आहे. भारताच्या या निर्णयामुळे पाकिस्तानला काश्मीर खोऱ्यात दहशतवादी कारवाया करता येणार नाहीत. मोदी सरकराने उचललेल्या या पावलामुळे पाकिस्तानला अशी भिती वाटते की आता पाक व्याप्त काश्मीर देखील त्यांच्या हातातून जाणार. काश्मीर संदर्भातील कलम 370चा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचा अयशस्वी प्रयत्न झाल्यानंतर पाकिस्तान आणखी दबावात आले आहे. याच दबावानंतर पंतप्रधान इमरान खान (Imran Khan Government) यांनी मंत्रिमंडळातील सहकार्यांशी चर्चा करून लष्कर प्रमुख (Pakistan Army Chief) जनरल कमर जावेद बाजवा (General Qamar Javed Bajwa)यांचा कार्यकाळ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

पाकिस्तानचे लष्कर प्रमुख बाजवा हे या वर्षी निवृत्त होणार आहेत. पण इमरान खान यांनी त्यांना 3 वर्षाची मुदत वाढ दिली आहे. ही मुदत वाढ देताना पाकिस्तान सरकारने देशाची सुरक्षा लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. यासंदर्भात पाकच्या पंतप्रधान कार्यालयाने एक अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या अधिसूचनेत म्हटले आहे की, जनरल बाजवा यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या तारखेपासून आणखी 3 वर्षासाठी तो वाढवण्यात आला आहे. हा निर्णय देशाचे वातावरण सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीकोणातून घेतला आहे.

कार्यकाळ वाढवण्याचे हे आहे खरं कारण

जनरल बाजवा यांचा कार्यकाळ वाढवण्याचे मुख्य कारण नव्या लष्कर प्रमुखांना सध्याची परिस्थिती निट हाताळता येईल याबाबत इमरान यांना शका वाटते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इमरान खान यांना जनरल बाजवा यांचा कार्यकाळ वाढवायचा नव्हता. त्यांच्यामते कार्यकाळ केवळ 1 वर्षासाठी वाढवण्यात यावा. पण तो 3 वर्षाचा करण्यात यावा यासाठी इमरान यांच्यावर दबाव टाकण्यात आल्याचे समजते. 58 वर्षीय इमरान या वर्षी निवृत्त होणार होते. जनरल बाजवा यांची नवाज शरीफ सरकार(Nawaz Sharif Government)ने नोव्हेंबर 2016 मध्ये लष्कर प्रमुखपदी नियुक्ती केली होती.

राजनाथ सिंह यांच्या वक्तव्यानंतर घेतला निर्णय ?

लष्कर प्रमुखांचा कार्यकाळ वाढवण्याचा निर्णय इमरान खान यांनी आज घेतला आहे. विशेष म्हणजे भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एक दिवसापूर्वी पाकिस्तानशी केवळ पाक व्याप्त काश्मीर (POK)संदर्भातच चर्चा केली जाईल, असे स्पष्टपणे सांगण्यात आले होते. सिंह यांच्या वक्तव्याने पाकिस्तानची काळची आणखी वाढली आहे. खुद्द इमरान खान यांनी पाकच्या स्वतंत्र्य दिनादिवशी भारत पुन्हा एकदा बालाकोट सारखा हल्ला करण्याची शक्यता असल्याचे भिती व्यक्त केली होती.

नाना पाटेकर यांनी घेतली अमित शहांची भेट, EXCLUCIVE VIDEO

Published by: Akshay Shitole
First published: August 19, 2019, 7:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading