पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयात आग, PM इम्रान खानसह सर्व जण सुरक्षित

पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयात आग, PM इम्रान खानसह सर्व जण सुरक्षित

पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाला आग लागली

  • Share this:

इस्लामाबाद, 08 एप्रिल: पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाला आग लागली आहे. जिओ टिव्हीने दिलेल्या वृत्तानुसार या या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आग लागली तेव्हा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान इमारतीत होते. दुपारी 2.20 मिनिटांनी ही आग लागली होती.

पाकिस्तानमधील जिओ टिव्हीने दिलेल्या वृत्तानुसार पंतप्रधान कार्यालयाच्या सहाव्या मजल्यावर ही आग लागली होती. आग लागली तेव्हा पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांचे अन्य सहकारी पाचव्या मजल्यावर होते. आगीचे वृत्त कळताच त्यांना सुरक्षा अधिकाऱ्यांनी तातडीने बाहेर येण्यास सांगितले. तेव्हा इम्रान यांनी आधी सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढा मगच मी बाहेर पडेन, असे सांगितले. पंतप्रधान कार्यालय ज्या परिसरात आहे अशा ठिकाणी आग कशी लागू शकते, असा सवाल आता विचारला जात आहे. या कार्यालयाच्या जवळच राष्ट्रपती भवन आणि अन्य महत्त्वाची कार्यालये आहेत. त्यामुळे अति महत्त्वाच्या ठिकाणी लागलेली आग ही अपघात आहे की घातपात याची चौकशी केली जाणार आहे.

हे देखील पाहा: PHOTO : पाकिस्तान गरिबी आणि बेरोजगारीच्या खाईत, कर्ज देणार कोण?

VIDEO : शिवसेना खासदारांनी जात काढल्यावर अमोल कोल्हेंचा जाहीर सभेतून पलटवार

First published: April 8, 2019, 3:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading