• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • 'भारतासोबत बोलण्याची ही योग्य वेळ नाही'; IND vs Pak सामन्यानंतर पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं विधान

'भारतासोबत बोलण्याची ही योग्य वेळ नाही'; IND vs Pak सामन्यानंतर पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं विधान

पंतप्रधान इम्रान खान यांनी सौदी अरेबियामध्ये भारताशी संबंध सुधारण्याची गरज असल्याचं सांगितले. मात्र, या संवादासाठी ही वेळ योग्य नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केले.

 • Share this:
  नवी दिल्ली 26 ऑक्टोबर : टी-20 विश्वचषकातील (T-20 World Cup) विजयाची नशा पाकिस्तानातील प्रत्येक सामान्य आणि खास व्यक्तींच्या डोक्यावर चढली आहे. जनता वेगवेगळ्या पद्धतीनं आपला आनंद व्यक्त करत आहे. तर, मंत्री मुंगी काहीही विधानं करत आहेत. आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan on India Pakistan Match) यांनीही असंच वक्तव्य केलं आहे. यावरून हा विजय पाकिस्तानींसाठी किती महत्त्वाचा आहे, हे दिसून येतं. T20 World Cup IND vs PAK : अंपायर झोपा काढतात का? या Photo मुळे नवा वाद पाकिस्तानच्या SammaTVच्या वृत्तानुसार, पंतप्रधान इम्रान खान यांनी सौदी अरेबियामध्ये बोलताना भारताशी संबंध सुधारण्याची गरज असल्याचं सांगितले. मात्र, या संवादासाठी ही वेळ योग्य नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केले. त्यामागे इम्रान खान यांनी रविवारी झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्याच्या निकालाचं कारण दिलं. T20 World Cup, IND vs PAK : 2017 ते 2021, 4 वर्ष 4 सामने, टीम इंडियाची तीच चूक पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान रियाधमध्ये पाकिस्तान-सौदी इनव्हेस्टमेंट फोरमला संबोधित करत होते. यादरम्यान, ते म्हणाले की रविवारी रात्री भारताच्या T20 विश्वचषकातील पराभवानंतर शेजारी देशाशी संबंध सुधारण्याबद्दल बोलण्यासाठी ही 'उत्तम वेळ' नाही. भारतासोबतचे संबंध सुधारले तर ते दोन्ही देशांसाठी चांगले होईल, असेही ते म्हणाले. T20 World Cup : 9 वर्ष... विराटची विकेट घ्यायला पाकिस्तानला लागला एवढा वेळ पाकिस्तान-सौदी अरेबिया इन्व्हेस्टमेंट फोरममध्ये बोलताना इम्रान खान म्हणाले, 'भारत आणि पाकिस्तानमध्ये एकच मुद्दा आहे - काश्मीर. हा मुद्दा दोन 'सभ्य' शेजार्‍यांप्रमाणे सोडवला पाहिजे. 72 वर्षांपूर्वी संयुक्त राष्ट्रांनी काश्मिरींना दिलेल्या हक्कांशिवाय आमच्याकडे कोणताही मुद्दा नाही.
  Published by:Kiran Pharate
  First published: