जिथे हरीश साळवेंनी घेतला 1 रुपया, तिथे पाककडून लढण्याऱ्या 'या' वकिलाने घेतले 4 कोटी !

जिथे हरीश साळवेंनी घेतला 1 रुपया, तिथे पाककडून लढण्याऱ्या 'या' वकिलाने घेतले 4 कोटी !

भारतकडून लढणारे हरीश साळवे यांनी फक्त 1 रुपया फी घेतली. तर कुरेशी यांनी पाकिस्तानकडून लढण्यासाठी 4 कोटी 20 लाख रुपये घेतलेत.

  • Share this:

20 मे : कुलभूषण जाधव प्रकरणी पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टात तोंडावर आपटलं. या पराभवानंतर आता जे वकील पाकची बाजू मांडत होते त्याची पाकमध्ये चांगलीच धुलाई सुरू आहे. खावर कुरेशी असं या वकिलांचं नाव आहे. त्यांनी या केससाठी तब्बल 4 कोटी रुपये घेतले.

भारतीय माजी नौसेना अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तान आर्मी कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावलीये. याविरोधात भारत आतंरराष्ट्रीय कोर्टात गेलं. यासाठी भारताकडून ही केस  हरीश साळवे लढवतं आहेत तर पाकिस्तानकडून ही केस खावर कुरेशी लढवतं आहे. आंतरराष्ट्रीय कोर्टात हेचं कुरेशी 2004 ला दाभोळ प्रकल्पावेळी एनरॉन कंपनी विरोधात भारताकडून लढले होते. कुरेशी यांना भारताच्या बाजूने लढण्यासाठी यूपीए सरकारकडून नेमणूक करण्यात आली होती.

कुरेशी हे मुळचे लंडनचे असून 1993 साली सर्वात लहान वकील म्हणून आतंराराष्ट्रीय कोर्टात वकिली केली होती. भारतकडून लढणारे हरीश साळवे यांनी फक्त 1 रुपया फी घेतली. तर कुरेशी यांनी पाकिस्तानकडून लढण्यासाठी 4 कोटी 20 लाख रुपये घेतलेत. यामुळे पाकिस्तानात कुरेशी यांच्यासह पाकिस्तान सरकार विरोधाक जोरदार टीका सुरू आहे.

First published: May 20, 2017, 8:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading