पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यासाठी पाकिस्तानने नाकारली एअर स्पेस; म्हणाले...

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यासाठी पाकिस्तानने नाकारली एअर स्पेस; म्हणाले...

पाकिस्तानने पुन्हा एकदा त्यांचा खरा चेहरा जगाला दाखवला.

  • Share this:

कराची, 18 सप्टेंबर: पाकिस्तानने पुन्हा एकदा त्यांचा खरा चेहरा जगाला दाखवला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेशी दौऱ्यासाठी पाकिस्तानने एअर स्पेस देण्यास नकार दिला आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी भारतीय उच्चायुक्ताला यासंदर्भातील नकार कळवला आहे. याआधी पाकिस्ताननने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या परदेशी दौऱ्यासाठी हवाई क्षेत्राचा वापर करण्यास नकार दिला होता. पंतप्रधान मोदी 21 सप्टेंबरपासून एक आठवड्याच्या अमेरिकी दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. त्यासाठी भारताने हवाई क्षेत्र वापरण्याची विनंती केली होती.

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारताने बालाकोट येथे जैश-ए-मोहम्मदच्या तळावर एअर स्ट्राईक केला होता. भारताने केलेल्या या कारवाईनंतर पाकिस्तानने 26 फेब्रुवारीपासून स्वत:चे हवाई क्षेत्र वापरण्यास बंदी घातली होती. अर्थात त्यानंतर मार्च महिन्यात पाकिस्तानने ही बंदी काही प्रमाणात कमी केली होती. पण तेव्हाही भारतीय विमानांना हवाई क्षेत्र वापरण्यास त्यांनी बंदी घातली होती. त्यानंतर मोदी सरकारने जम्मू-काश्मीरसाठीचे कलम 370 रद्द केल्यानंतर दोन्ही देशात पुन्हा तणाव निर्माण झाले आहेत.

मोदींच्या आधी राष्ट्रपती कोविंद यांच्या परदेशी दौऱ्यासाठी भारताने पाकिस्तानकडे एअर स्पेस वापरण्याची परवानगी मागितली होती. तेव्हा राष्ट्रपती कोविंद आईसलँड, स्लोव्हेनिया आणि स्वित्झर्लंड या देशांच्या दौऱ्यावर जाणार होते. पण तेव्हा काश्मीर मुद्द्यावर सुरु असलेल्या तणावामुळे पाकिस्तानने परवानगी नाकारली होती. राष्ट्रपतींच्या दौऱ्यासाठी एअर स्पेस न देण्याचा निर्णय पंतप्रधान इम्रान खान यांनी घेतला होता. आता PM मोदींच्या दौऱ्यासाठी परवानगी नाकारण्यात आली आहे. अशी माहिती आणि भारतीय उच्चायुक्त कार्यालयाला दिल्याचे कुरेशी यांनी सांगितले.

पाकिस्तानला विचारले, 'दहशतवादी चंद्रावरून येतात का?'

जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून घेतल्यानंतर पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय पातळीवर थयथयाट करण्यास सुरुवात केली. प्रथम काश्मीर हा आंतरराष्ट्रीय प्रश्न असल्याचे सांगत पाकिस्तान संयुक्त राष्ट्र संघात गेले. पण तिथेही पाकिस्तान तोंडावर पडले. एकाही देशाने पाकिस्तानला साथ दिली नाही. अमेरिका असो की शेजारचे मुस्लिम राष्टें पाकिस्तानला काश्मीर किंवा भारताविरुद्ध मदत करण्यास एकाही देशाने मदत केली नाही. याबाबत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान नेहमीच तोंडावर पडत आले आहेत. आता थेट युरोपीयन युनियनच्या संसदेने काश्मीर आणि भारताविरुद्ध खोटा प्रचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानला चपराक लगावली आहे.

युरोपीयन युनियनच्या संसदेत अनेक खासदारांनी एक सुरात पाकिस्तानवर टीका केली. संसदेतील अनेक खासदारांनी सांगितले की, आपण सर्वांनी मिळून भारताचे समर्थन केले पाहीजे. कारण पाकिस्तान नेहमीच दहशतवाद्यांना संरक्षण देत आला आहे आणि हेच दहशतवादी शेजारच्या राष्ट्रात हल्ले करतात. काश्मीर आणि भारताविषयी गैरसमज पसरवणाऱ्या पाकिस्तानला बसलेला हा मोठा दणका मानला जात आहे.

VIDEO मुख्यमंत्र्यांना कोण खोटं बोलायला लावतंय?आदित्य ठाकरेंनी केला हा गंभीर आरोप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 18, 2019 08:59 PM IST

ताज्या बातम्या