कुलभूषण जाधव हे हेर आणि दहशतवादीच, पाकचा कांगावा सुरूच

कुलभूषण जाधव हे हेर आणि दहशतवादीच, पाकचा कांगावा सुरूच

कुलभूषण जाधव यांची प्रकृती उत्तम असून यावेळी पाकिस्ताननं त्यांचं हेल्थकार्डही दाखवलं.

  • Share this:

25 डिसेंबर : कुलभूषण जाधव हे हेर आणि दहशतवादी असल्याचा कांगावा पाकिस्ताननं पुन्हा केलाय. पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्ते मोहम्मद फैजल यांनी पत्रकार परिषदेत हा आरोप केलाय.

हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तान सरकारनं अटक केलेल्या कुलभूषण जाधव यांनी त्यांच्या आई आणि बायकोशी फक्त काचेच्या भिंतीपलिकडून आज संवाद साधला. पंधरा मिनिटांची ही भेट होती. पण ही भेट चाळीस मिनिटांपर्यंत वाढवण्यात आल्याचं सांगण्यात आलं.

या भेटीनंतर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्ते मोहम्मद फैजल यांनी पत्रकार परिषद घेऊन जाधव यांच्यावर बेछुट आरोप केले. कुलभूषण जाधव हे हेर आणि अतिरेकीच  आहे असं फैजल म्हणाले.

तसंच कुलभूषण जाधव यांची प्रकृती उत्तम असून यावेळी पाकिस्ताननं त्यांचं हेल्थकार्डही दाखवलं. जाधव कुटुंबीयांना अर्ध्या तासाची भेट दिली होती. पुढं त्यात दहा मिनिटांची वाढ करण्यात आल्याचं फैजल यांनी सांगितलं.

First published: December 25, 2017, 10:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading