S M L

अमेरिकेचा पाकला दणका, दहशतवाद्यांना पोसणारा देश म्हणून केलं जाहीर

लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद संघटना अजूनही पाकमधून संचलित आहे.

Sachin Salve | Updated On: Jul 19, 2017 10:49 PM IST

अमेरिकेचा पाकला दणका, दहशतवाद्यांना पोसणारा देश म्हणून केलं जाहीर

19 जुलै : अमेरिकेनं पाकिस्तानला चांगलाच दणका दिलाय. दहशतवाद्यांनी शह देणाऱ्या देशाच्या यादीत पाकिस्तानचा समावेश केलाय. लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद सारख्या दहशतवादी संघटनेची पाळंमुळं  पाकिस्तानात आहे यावर अमेरिकेनंही शिक्कामोर्तब केलंय.

दरवर्षी अमेरिकेच्या सरकारकडून 'कंट्री रिपोर्ट आॅन टेरेरिझम' सादर केला जातो. यात अमेरिकेनं या रिपोर्टमध्ये म्हटलंय की, लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद संघटना अजूनही पाकमधून संचलित आहे. पाकचं सैन्य आणि सुरक्षारक्षकांनी तहरीक-ए-तालिबान सारख्या संघटनेनं पाकवर हल्ले केले त्यांच्यावर कारवाई केलीये.

अमेरिकेचं गृहमंत्रालय म्हणतं, पाकिस्तानने अफगान-तालिबान यांच्यावर कारवाई किंवा अफगानिस्तानमध्ये अमेरिकेला नुकसान पोहचवणाऱ्या तत्वांवर कारवाई केली नाही आणि तसा प्रयत्नही केला नाही. विशेष म्हणजे पाकने या दोन्ही संघटनांना अफगान शांती प्रक्रियेत समावेश करण्याचा प्रयत्न केला.पाकने दुसऱ्या देशांना टार्गेट करणाऱ्या दहशतवादी संघटना लष्कर आणे जैश ए मोहम्मदच्या विरोधात 2016 पर्यंत कोणतीही कारवाई केली नाही. या संघटना पाकमध्ये मोठ्या झाल्या, पैसे गोळा केले असा आरोपही अमेरिकेनं केलाय.

भारताला माओवादी आणि पाकमधील दहशतवाद्यांचे हल्ले सहन करावे लागले. भारतीय अधिकाऱ्यांनी जम्मू-काश्मीर सीमारेषेवर होणाऱ्या हल्ल्याला पाकिस्तानाला दोषी धरलंय.

या रिपोर्टच्या नुसार, जानेवारीमध्ये पठानकोटमध्ये झालेल्या हल्ल्याला भारताने जैश-ए-मोहम्मदला दोषी धरलंय. 2016 मध्ये भारताने संयुक्त राष्ट्रांकडे दहशतवाद्यांविरोधात सहकार्याची मदत मागितली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 19, 2017 10:49 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close