Home /News /videsh /

वेदनादायी! चीनमध्ये कोरोना व्हायरसची भीती, कुत्रे-मांजरांनाही घराबाहेर फेकलं

वेदनादायी! चीनमध्ये कोरोना व्हायरसची भीती, कुत्रे-मांजरांनाही घराबाहेर फेकलं

छायाचित्रांमध्ये पाळीव प्राणी मेल्यानंतर रक्ताने माखलेल्या अवस्थेत रस्त्यावर पडलेले दिसत आहेत

    बीजिंग, 2 फेब्रुवारी : चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) सर्वत्र गोंधळ माजला आहे. येथील नागरिक बचावासाठी पुरेपूर प्रयत्न करीत आहेत. आतापर्यंत या भयावह व्हायरसमुळे 300 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. प्रत्येक ठिकाणी फिरताना लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. यादरम्यान चीनमधून आलेल्या वृत्तामुळे मनाचा ठोकाच चुकला आहे. येथील लोक आपल्या घरातील पाळीव प्राण्यांना घराबाहेर फेकून देत असल्याचे समोर आले आहे. ब्रिटनचे वृत्तपत्र ‘द सन’ ने दिलेल्या वृत्तानुसार चीन (China) मध्ये कोरोना व्हायरस प्राण्यांमधून पसरतो अशी अफवा पसरली आहे. धक्कादायक छायाचित्र या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, याबाबत अनेक धक्कादायक छायाचित्र समोर आले आहेत. या छायाचित्रांमध्ये पाळीव प्राणी मेल्यानंतर रक्ताने माखलेल्या अवस्थेत रस्त्यावर पडले आहेत. असं सांगितलं जात आहे, की लोक आपल्या अपार्टमेंटमधून कुत्रे आणि मांजरांना बाहेर फेकत होते. तेथील लोक या गोष्टीची तक्रार करीत होते की शांघाईमध्ये 5 मांजरींना घरातून बाहेर फेकून दिले आहे. या प्राण्यांचे मृतदेह रस्त्यावर पडलेले आढळले. चीनच्या एका डॉक्टरांनी सरकारी टीव्हीवर सांगितले, की जर कोणत्यागी रुग्णाच्या संपर्कात प्राणी आला तर त्याला घरात वेगळे ठेवावे. डॉक्टरांच्या वक्तव्य चुकीच्या पद्धतीने दर्शविण्यात आला. त्यांच्या या वक्तव्यामुळे लोकांमध्ये चुकीचा संदेश पोहोचला. याचा परिणाम असा झाला की, प्राण्यांमधून कोरोना व्हायरस पसरतो अशी समज लोकांमध्ये निर्माण झाली. या प्रकरणानंतर चीनच्या ग्लोबल टीव्हीने WHO ची प्रतिक्रिया जारी केली. यामध्ये ते म्हणाले की, प्राण्यांमधून कोरोना व्हायरस पसरतो असं कोणतंही तथ्य अभ्यासातून सिद्ध झालेलं नाही. कोरोना व्हायरसची भीती साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने हॉंगकॉंग विश्वविद्यालयातील वैज्ञानिकांद्वारा केलेल्या अभ्यासानुसार वुहान शहरात 75,815 लोक कोरोना व्हायरसपासून संक्रमित झाले आहेत.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: China, Coronavirus

    पुढील बातम्या