आता लहान मुलांवरही होणार कोरोनाच्या लसीची चाचणी? पालकांनी घेतला धसका

आता लहान मुलांवरही होणार कोरोनाच्या लसीची चाचणी? पालकांनी घेतला धसका

लहान मुलांनाही लसीची (Vaccine) गरज पडणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 02 जून : कोरोनाव्हायरसविरोधातील (coronavirus) लसीच जगभर वेगवेगळ्या लसींचं ट्रायल सुरू आहे. काही लसींचं ह्युमन ट्रायल सुरू झालेलं आहे. लसीच्या मानवी परीक्षणात आला लहान मुलांचाही (children) समावेश केला जाणार आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमार्फत (Oxford University) तयार करण्यात आलेल्या लसीची (Vaccine) आता लहान मुलांवरही चाचणी केली जाणार आहे.

लहान मुलांना कोरोनाव्हायरसची लागण झाल्याची प्रकरणं कमी आहेत. मात्र त्यांनाही कधी ना कधी याची गरज पडेल. त्यामुळे लहान मुलांवरही चाचणी करण्याचा निर्णय शास्त्रज्ञांनी घेतला आहे. 5 ते 12 वयोगटातील मुलांवर लसीची चाचणी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

हे वाचा - Coronavirus : देशात 2 लाखांपर्यंत पोहोचला कोरोनाचा आकडा, ही आहे ताजी आकडेवारी

लंडन स्कूल ऑफ हायजिन अँड ट्रॉपिकल मेडिसीनच्या वॅक्सिन सेंटरचे (London School of Hygiene and Tropical Medicine's vaccine center) संचालक आणि पिडियाट्रिक इन्फेक्शन आणि इम्युनिटीचे प्राध्यापक बिएट कॅम्पमॅन सांगतात, "हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे. मात्र सर्वांनी स्वत:ला विचारायला हवं. आपल्या मुलाला पुढे जाऊन लसीची गरज पडेल. इतर सर्व लोकं सुरक्षित लस विकसित करण्यासाठी मदत करत आहेत. ज्या लोकांनी हे छोटंस पाऊल उचललं आहे, त्यांचे आपण आभार मानायला हवेत"

हे वाचा - कोरोनावरील उपचारासाठी 'हे' औषध धोकादायक, मृतांची संख्या आणखी वाढेल; WHOचा इशारा

ऑक्सफर्डने विकसित केलेल्या लसीच्या प्रयोगाच्या पुढील टप्प्यात लहान मुलांवरही या लसीचा प्रयोग केला जाणार आहे. जूनमध्येच या लसीचं व्यापक स्तरावर ट्रायल होणार आहे. 10260 लोकांवर या लसीची चाचणी केली जाणार आहे. याआधी वयस्कर व्यक्तींवर या लसीचा प्रयोग करण्यात आला. ज्यांच्यामध्ये सौम्य ताप आणि हातात वेदना असे थोडेफार अस्थायी प्रभाव दिसून आला.

हे वाचा - कोरोनाच्या संकटात आता आणखी एका व्हायरसची एण्ट्री, आतापर्यंत 5 लोकांचा मृत्यू

First published: June 2, 2020, 2:58 PM IST

ताज्या बातम्या