मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

बापरे! चीनमध्ये दर वर्षी होते 1 कोटी कुत्र्यांची हत्या; पण का? धक्कादायक कारण वाचून तुम्हालाही येईल संताप

बापरे! चीनमध्ये दर वर्षी होते 1 कोटी कुत्र्यांची हत्या; पण का? धक्कादायक कारण वाचून तुम्हालाही येईल संताप

चीनमध्ये कुत्र्यांना का मारतात जाणून घ्या

चीनमध्ये कुत्र्यांना का मारतात जाणून घ्या

कोरोनामुळे या मांसविक्रीवर बंदी येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतु तसं काही झालं नाही.

चीन (China) हा देश सातत्याने अनेक कारणांमुळे चर्चेत असतो. जगात कोरोना पसरण्यास चीन जबाबदार असल्याचं मानलं जात आहे; मात्र चीनने गेल्या दोन वर्षांत आपली चूक मान्य केलेली नाही. वटवाघळाचं मांस खाल्ल्यानं हा विषाणू माणसांमध्ये पसरला आणि त्यानंतर त्या विषाणूने संपूर्ण जगाला वेठीस धरलं, असा आरोप चीनवर करण्यात आला. त्यानंतर विचित्र पद्धतीनं वेगवेगळ्या प्राण्यांच्या मांसाची विक्री करणारी चीनमधली अनेक मीट मार्केट्स (Meat Market) अर्थात मांसाच्या बाजारपेठा चर्चेत आल्या. या मीट मार्केट्समध्ये वटवाघळांपासून ते विविध प्रकारच्या सापांपर्यंतच्या मांसाचा समावेश असतो.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अल्पावधीतच ही मीट मार्केट्स बंद करण्यात आली; मात्र काही काळानंतर ही मार्केट्स पूर्ववत सुरू झाली. कोरोनापूर्वी चीनला एका मीट फेस्टिव्हलमुळे मोठ्या विरोधाचा सामना करावा लागला होता. डॉग मीट फेस्टिव्हल (Dog Meat Festival) असं या फेस्टिव्हलचं नाव होतं. चीनमध्ये कुत्र्याचं (Dog) मांस अतिशय आवडीनं खाल्लं जातं. तिथे केवळ कुत्र्यांचंच नव्हे, तर मांजराचं (Cat) मांसही मोठ्या प्रमाणात विकलं जातं. कोरोनामुळे या मांसविक्रीवर बंदी येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतु तसं काही झालं नाही.

तुम्हीही रात्री उशिरापर्यंत जागून अभ्यास करता? मग जाणून घ्या फायदे आणि तोटे

एका वृत्तानुसार, आताही चीनमध्ये दर वर्षी मांसासाठी 1 कोटीहून अधिक कुत्र्यांना मारलं जातं. कुत्र्यांच्या मांसावर प्रक्रिया (Process) करून ते कॅनमध्ये साठवलं जातं किंवा त्यापासून सॉसेस बनवले जातात. या सर्वांत कुत्र्यांच्या प्रायव्हेट पार्टला (Private Part) नागरिकांची अधिक पसंती असते. हे पार्ट चीनमध्ये आवडीनं खाल्ले जातात. हा प्रायव्हेट पार्ट उत्तम स्नॅक (snacks) समजला जातो. चीनमधल्या क्रूर अशा मीट मार्केट्समध्ये या निष्पाप प्राण्याच्या मांसाची बिनदिक्कत विक्री होते.

चीनमध्ये अनेकदा पाळीव कुत्र्यांचं अपहरण करूनही त्यांचं मांस विकलं जातं. `द ह्युमन सोसायटी`नं याबाबत एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार, दर वर्षी सुमारे एक कोटी कुत्र्यांना मारून त्याचं मांस विकलं जातं. कुत्र्यांचं मांस इतक्या मोठ्या प्रमाणावर विकलं जाण्यामागं काही चुकीच्या वैद्यकीय समजुती कारणीभूत आहेत. ज्येष्ठ व्यक्ती ताकदीसाठी या मांसाचं सेवन करतात. परंतु, याला कोणताही वैद्यकीय आधार अथवा पुरावा नाही. चीनमध्ये 29 मे 2020 पासून कुत्र्यांचं मांस विकण्यास बंदी घालण्यात आली होती. तरीदेखील या मांसाची बिनदिक्कत विक्री होत आहे. चीनशिवाय थायलंड (Thailand) आणि व्हिएतनामसह (Vietnam) अन्य काही देशांमध्ये कुत्र्याच्या मांसाची खुलेआम विक्री होते आणि विशेष म्हणजे तिथले नागरिक हे मांस आवडीनं खातात.

First published:

Tags: China