बांग्लादेशमध्ये बलात्काराचा VIDEO समोर आल्यानंतर जनआक्रोश; सरकारने घेतला मोठा निर्णय

बांग्लादेशमध्ये बलात्काराचा VIDEO समोर आल्यानंतर जनआक्रोश; सरकारने घेतला मोठा निर्णय

येथे जानेवारी ते ऑगस्टपर्यंत बलात्काराच्या 889 घटना घडल्या आहेत. यापैकी 41 पीडितेचा मृत्यू झाला आहे

  • Share this:

ढाका, 12 ऑक्टोबर : बांग्लादेशात नुकताच लैंगिक हल्ल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहे. यानंतर येथील रस्त्यांवर सोशल मीडियावर जनआक्रोश पाहायला मिळत आहे. यावर बांग्लादेश सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने मंत्रिमंडळात बलात्कार प्रकरणात अधिकतम जन्मठेपेची शिक्षा वाढवून मृत्यूदंड करण्यासाठी सोमवारी मंजुरी दिली आहे. मंत्रिमंडळाचे प्रवक्ता खांडकर अनवारुल इस्लामने सांगितले की, राष्ट्रपती अब्दुल हामिद महिला व बाल अत्याचार अधिनिमयाच्या संशोधनासंबंधित अध्यादेश जारी करू शकतात. कारण सध्या संसदेचं सत्र सुरू नाही.

पहिल्यांदा अधिकतम शिक्षा जन्मठेप

सध्याच्या कायद्यानुसार तेथे बलात्कार प्रकरणात अधिकतम शिक्षा जन्मठेप आहे. जेथे पीडितेचा मृत्यू होते तेथे मृत्यूदंडाची परवानगी दिली जाते.

अध्यादेश जारी करू शकतात राष्ट्रपती

कायदे मंत्री अनीसुल हक यांनी सांगितले की, राष्ट्रपती मंगळवारी अध्यादेश जारी करू शकतात. काही दिवसांपूर्वी लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांनंतर ढाका आणि अन्य ठिकाणी आंदोलन पुकारण्यात आले होते. महिलांच्या अधिकारांसाठी संघर्ष करणाऱ्या संघटनाही समोर आल्या होत्या. यापैकी आइन-ओ-सालिश केंद्रानुसार जानेवारीपासून ऑगस्टपर्यंत बलात्काराच्या 889 घटना घडल्या आहेत. यापैकी 41 पीडितेचा मृत्यू झाला आहे.

हे ही वाचा-महिलेचा निर्वस्त्र अवस्थेत आढळला मृतदेह; शरीरावर अमानुष मारहाणीच्या खुणा

न्याय द्या

काही दिवसांपूर्वी फेसबुकवर एक व्हिडीओ आला होता आणि त्यात दक्षिण-पूर्व जिल्ह्यात काही लोक एका महिलेला निर्वस्त्र करीत तिच्यावर हल्ला करीत असल्याचे दिसत होते. देशाच्या मानवी हक्क आयोगाने दिलेल्या माहितीनुसार या महिलेवर एका वर्षात वारंवार बलात्कार करण्यात आला. दुसऱ्या एका प्रकरणात महिलेला कारने खेचत काॅलेजच्या डॉर्मेट्रीमध्ये आणण्यात आलं व तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला.

Published by: Manoj Khandekar
First published: October 12, 2020, 8:54 PM IST

ताज्या बातम्या