Home /News /videsh /

ऑस्कर विजेत्या डिझायनरने संपूर्ण घराला दिला काळा रंग, हे आहे थक्क करणारं कारण

ऑस्कर विजेत्या डिझायनरने संपूर्ण घराला दिला काळा रंग, हे आहे थक्क करणारं कारण

अमेरिकेत या वर्षी Black Lives Matter ही चळवळ मोठ्या प्रमाणात राबवली गेली. त्याचबरोबर कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) संकटाचा देखील अमेरिकेतील नागरिकांना मोठा फटका बसला आहे.

    न्यू ऑर्लिन्स, 02 डिसेंबर: अमेरिकेत या वर्षी Black Lives Matter ही चळवळ मोठ्या प्रमाणात राबवली गेली. अमेरिकेत यावर्षी मे महिन्यात कृष्णवर्णीय नागरिक जॉर्ज फ्लॉयड(George Flloyd) यांची हत्या झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात कृष्णवर्णीय नागरिकांच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आलं होतं. त्याचबरोबर कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) संकटाचा देखील अमेरिकेतील नागरिकांना मोठा फटका बसला आहे. या पँडेमिकमध्ये अमेरिकेत लाखोंच्या संख्यने अनेकांनी जीव गमावला आहे. 2020 हे वर्ष सर्वांसाठीच अतिशय कठीण गेले असून या वर्षाचं स्मरण ठेवण्यासाठी  ऑस्कर पुरस्कार विजेती  प्रॉडक्शन डिझायनर हॅना बिचलरने (Production Designer Hannah Beachler) हिने तिच्या घराबाहेरील भिंती, छत आणि खिडकीच्या चौकटी यांना काळा रंग दिला आहे. न्यू ऑर्लिन्समधील (New Orleans) रहिवासी असलेल्या बिचलरने ट्विटरवर तिच्या नव्याने सुसज्ज अशा घराचे फोटो पोस्ट केले आहेत. त्यानंतर तिच्या क्रिएटीव्ह प्रयत्नांनी प्रभावित झालेल्या नेटिझन्सनी ट्विटरवर तिचं कौतुक केलं आहे. 27 नोव्हेंबरला पोस्ट केलेल्या तिच्या ट्विटमध्ये हॅनाने ‘2020 च्या स्मरणार्थ मी माझं घर ब्लॅकिटी ब्लॅक ब्लॅक ब्लॅक केलं आहे !!! होला.’ असं कॅप्शन देखील दिले आहे. या पोस्टमध्ये तिने आपल्या घराचे काळ्या रंगाचे तीन फोटो पोस्ट केले असून यामध्ये घराचा प्रत्येक भाग काळ्या रंगाने रंगवण्यात आला आहे. यामध्ये  तिने घराच्या भिंती, बाह्य, पट्ट्या, छतावरील आणि खिडकीच्या चौकटी देखील काळ्या रंगाने रंगवल्या आहेत. पूर्ण घराला काळा रंग देताना समोरचा दरवाजा पांढरा ठेवला आहे.  बिचलरने या घराकडे लक्ष वेधण्यासाठी दरवाजा पांढरा ठेवला आहे. या कामासाठी तिने प्रोफेशनल कामगारांची मदत घेतली असून दोन महिन्यांच्या कालावधीत हे काम पूर्ण झालं आहे. तिच्या ट्वीट्सना चांगला प्रतिसाद मिळत असून दीड लाखांपेक्षा जास्त लाईक्स देखील मिळाले आहेत. एकाने यावर प्रतिक्रिया देताना तुझे घर मला आवडले असल्याचे म्हटले आहे. (हे वाचा-लंडनचा हॅवलॉक रोड होणार गुरूनानक रोड!) दरम्यान, एका युजरनं म्हटलं आहे की, 'रंग देताना त्यातील सुक्ष्म लेअर्स जबरदस्त आहेत. गंमत नाही, मिस हॅना, एक कलाकार म्हणून तुम्ही माझ्यासाठी प्रेरणादायक आहात. हे पाहून मला #Lamonade ची आठवण झाली. ही कलाकृती संग्रहालयात ठेवण्याच्या दर्जाची आहे.' अशाप्रकारे अनेक कौतुक करणाऱ्या कमेंट्स हॅनाच्या ट्वीटवर येत आहेत. (हे वाचा-HORROR! पाय कापला, रक्त काढणार इतक्यात... पोस्टमॉर्टेम करता करता रडत उठला मृतदेह) कोरोनाचा अमेरिकेला मोठा फटका बसला असून जगभरात कोरोना व्हायरसमुळे  1.45  मिलियन नागरिकांचा मृत्यू झाला असून 13.3 मिलियन रुग्ण संपादले असून एकट्या अमेरिकेत 2 लाख 66 हजार नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जगभरात कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेला अमेरिका हा एकमेव देश आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या