'जिहादींचा युवराज' म्हणवल्या गेलेल्या दहशतवाद्याचा खात्मा; अमेरिकेने दिली मोठी बातमी

'जिहादींचा युवराज' म्हणवल्या गेलेल्या दहशतवाद्याचा खात्मा; अमेरिकेने दिली मोठी बातमी

ओसामा बिन लादेनचा मुलगा आणि Al-Qaeda चा तरुण म्होरक्या Hamza bin Laden चा अंत झाल्याची बातमी Donald Trump यांनी दिली आहे. भारतालाही त्याचापासून होता धोका

  • Share this:

वॉशिंग्टन (USA), 14 सप्टेंबर : अल कायदाचा म्होरक्या आणि ओसामा बिन लादेनचा मुलगा हमझा बिन लादेन Hamza bin Laden दहशतवादविरोधी कारवाईत ठार झाल्याची बातमी अमेरिकेने दिली आहे.

अमेरिकन माध्यमांनी लादेनचा मुलगा ठार झाल्याचं वृत्त आधीच दिलं होतं. अमेरिकन अध्यक्ष डोनल्ड ट्रंप Donald Trump यांनी त्यावर आज शिक्कामोर्तब केलं.

ट्रंप यांच्या वतीने व्हाइट हाऊसने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, 'हमझा बिन लादेनचा मृत्यू हा दहशतवाद्यांना धक्का आहे. वडिलांचा दहशतवादी वारसा चालवणाऱ्याचा मृत्यू अतिरेकी संघटनांसाठी इशारा आहे. त्यांचा म्होरक्या आणि कटकारस्थानं रचणारा नेता गेला, ही मोठी गोष्ट आहे.'

भारतानं मारले पाकचे सैनिक, मृतदेह नेण्यासाठी केली धावाधाव; पाहा VIDEO

हमझा बिन लादेन हा ओसामाच्या 20 मुलांपैकी 15 वा मुलगा होता. त्याच्या तिसऱ्या बायकोपासून झालेला हा मुलगा अल कायदाचा पुढचा वारसदार ठरला होता.

Loading...

हे वाचा - उदयनराजेंनी का केला भाजपमध्ये प्रवेश? राजू शेट्टींनी सांगितलं खरं कारण...!

त्याला crown prince of jihad असंही म्हटलं जायचं जिहादींचा हा युवराज अमेरिकेच्या दहशतवाद विरोधी कारवाईत ठार झाला. अमेरिकेबरोबरच इतर देशांवर हल्ला करण्याची भाषा असलेल्या त्याच्या प्रक्षोभक भाषणांचे ऑडिओ आणि व्हिडिओ पसरवले जायचे. भारतही अल कायदाच्या हिट लिस्टवर होता. त्यामुळे भारतालाही हमझापासून धोका होता.

------------------------------------------------------------------

श्रीनगरमध्ये तिरंगा फडकला, बारामतीतलं मुख्यमंत्र्यांचं UNCUT भाषण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 14, 2019 07:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...