मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

Operation London Bridge: राणी एलिझाबेथवर कसे होणार अंत्यसंस्कार? गुप्त तपशीलातून माहिती उघड

Operation London Bridge: राणी एलिझाबेथवर कसे होणार अंत्यसंस्कार? गुप्त तपशीलातून माहिती उघड

ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्याबाबतचा एक गुप्त अहवाल लीक झाला आहे. (File Photo)

ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्याबाबतचा एक गुप्त अहवाल लीक झाला आहे. (File Photo)

Operation London Bridge: ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II) यांच्याबाबतचा एक गुप्त अहवाल लीक झाला आहे. या अहवालात त्यांच्या मृत्यूनंतर ब्रिटनमध्ये काय घडामोडी घडणार याचा उल्लेख करण्यात आला आहे.

  • Published by:  News18 Desk

लंडन, 04 सप्टेंबर: ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II) यांच्याबाबतचा एक गुप्त अहवाल लीक झाला आहे. या अहवालात त्यांच्या मृत्यूनंतर ब्रिटनमध्ये काय घडामोडी घडणार याचा उल्लेख करण्यात आला आहे. ज्यामध्ये राणीच्या मृत्यूनंतर, यूकेमधील त्यांच्या अंत्यसंस्कारापासून ते पोलीस बंदोबस्तापर्यंतच्या सर्व बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे. असं असलं तरी बकिंघम पॅलेसनं याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत टिप्पणी केली नाही.

पीटीआयनं दिलेल्या वृत्तानुसार, ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या मृत्यूनंतर आखण्यात आलेल्या योजनांना 'ऑपरेशन लंडन ब्रिज' (Operation London Bridge) असं सांकेतिक नाव देण्यात आलं आहे. यासंदर्भातील माहिती अमेरिकन वृत्तसंस्था 'पॉलिटिको'नं प्रसिद्ध केली आहे. या वृत्तात असं म्हटलं आहे की, राणीच्या मृत्यूच्या दिवसाला प्रशासकीय अधिकारी 'डी-डे' म्हणून साजरा करतील. सोबतच राणीच्या मृत्यूनंतर 10 दिवसांनी त्यांच्यावर दफनविधी करण्यात येईल, असंही संबंधित अहवालात म्हटलं आहे. दरम्यान अंत्यविधी प्रक्रियेपूर्वी त्यांचा मुलगा प्रिन्स चार्ल्स (Prince Charles) संपूर्ण ब्रिटनचा दौरा करतील, अशी योजना आखण्यात आली आहे.

हेही वाचा-अफगाणी महिला न्यायाधीशांना जिवाची भीती, शिक्षा सुनावलेल्या कैद्यांची सुटका

संबंधित योजनेनुसार, राणीची शवपेटी तीन दिवस संसदेत ठेवली जाईल. राणीच्या निधनानंतर मोठ्या संख्येनं लोक लंडनला येतील. यावेळी पोलीस यंत्रणा आणि अन्नाचा अभाव यांसारख्या समस्यांबाबतही अहवालात चिंता व्यक्त करण्यात आली आहे. त्यांच्या अंत्यसंस्कारादरम्यान अभूतपूर्व गर्दी आणि प्रवासादरम्यानची वाहतूक कोंडी लक्षात घेता, सुरक्षिततेच्या दृष्टीनं मोठ्या तयारीचा उल्लेखही संबंधित योजनेत करण्यात आला आहे.

हेही वाचा-तालिबान आणि अल् कायदाची हातमिळवणी, पंजशीरचा पाडाव करण्यासाठी युती झाल्याची चर्चा

राणीच्या निधनानंतर लंडनमध्ये काय स्थिती असू शकते, याचा उल्लेखही या योजनेत करण्यात आला आहे. पॉलिटिकोच्या मते, राणीच्या मृत्यूनंतर, नविन राजा चार्ल्स ब्रिटनच्या चार राष्ट्रांना भेट देतील. त्यांच्या अंत्यसंस्काराचा दिवस राष्ट्रीय शोक दिवस म्हणून साजरा करण्यात येईल, याबाबतचा एक करारही ब्रिटिश पंतप्रधानांसोबत झाल्याचं संबंधित अहवालात नमूद करण्यात आलं आहे. यादिवशी संपूर्ण देशात राष्ट्रीय सुट्टी असणार आहे.

First published:

Tags: Britain