मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

अफगाणिस्तानमधील एकमेव विमानतळ उरलंय सामान्यांसाठी आशेचा किरण, इथे चालत नाही तालिबानची सत्ता

अफगाणिस्तानमधील एकमेव विमानतळ उरलंय सामान्यांसाठी आशेचा किरण, इथे चालत नाही तालिबानची सत्ता

अफगाणिस्तानवर (Afghanistan) तालिबाननं (Taliban) पूर्ण ताबा (Control) मिळवला असला, तरी एक विमानतळ (airport) मात्र अजूनही तालिबानच्या ताब्यात जाऊ शकलेलं नाही.

अफगाणिस्तानवर (Afghanistan) तालिबाननं (Taliban) पूर्ण ताबा (Control) मिळवला असला, तरी एक विमानतळ (airport) मात्र अजूनही तालिबानच्या ताब्यात जाऊ शकलेलं नाही.

अफगाणिस्तानवर (Afghanistan) तालिबाननं (Taliban) पूर्ण ताबा (Control) मिळवला असला, तरी एक विमानतळ (airport) मात्र अजूनही तालिबानच्या ताब्यात जाऊ शकलेलं नाही.

  • Published by:  desk news

काबूल, 24 ऑगस्ट : अफगाणिस्तानवर (Afghanistan) तालिबाननं (Taliban) पूर्ण ताबा (Control) मिळवला असला, तरी एक विमानतळ (airport) मात्र अजूनही तालिबानच्या ताब्यात जाऊ शकलेलं नाही. देशातून बाहेर पडण्याची इच्छा असणाऱ्या परदेशी नागरिकांसाठी आता हाच एकमेव आशेचा किरण उरला आहे. तालिबानच्या सत्तेला वैतागून देश सोडण्याच्या तयारीत असलेल्या अफगाणिस्तानमधील नागरिकांसाठी तर या विमानतळाशिवाय दुसरा कुठलाही पर्याय शिल्लक राहिलेला नाही.

हमीद करजई आंतरराष्ट्रीय विमानतळ

काबूलमधील हमीद करजई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे एकमेव असं विमानतळ आहे, जे अद्यापही तालिबानच्या ताब्यात गेलेलं नाही. काबूल शहर पूर्णतः तालिबानच्या ताब्यात आलं आहे. मात्र हे विमानतळ अद्यापही अमेरिकी सैन्याच्या ताब्यात आहे. त्यामुळे या विमानतळावर पोहोचण्यासाठी प्रत्येकजण जिवाची बाजी लावत असल्याचं चित्र आहे. काहीही करून या विमानतळावर पोहोचणे, हा प्रत्येकाच्या सुटकेतला पहिला टप्पा सध्या ठरतो आहे.

तालिबानकडून अडवणूक

अफगाणिस्तानमध्ये एकूण 4 आंतरराष्ट्रीय विमानतळं आहेत. त्यापैकी तीन विमानतळं तालिबाननं ताब्यात घेतली आहेत. या विमानतळावरून कुणाला प्रवेश द्यायचा आणि कुणाला माघारी पाठवायचं, याचा फैसला तालिबानीच करत असल्यामुळे अनेकांना तिथून माघारी फिरावं लागत आहे. तर काबूलमधील आंतरराष्ट्रीय विमानतळ अमेरिकी सैन्याच्या ताब्यात असलं, तरी तिथे पोहोचण्याच्या सर्व मार्गांवर तालिबानची सत्ता प्रस्थापित झाली आहे. त्यामुळे विमानतळावर पोहोचण्यापूर्वी प्रत्येकाला तालिबानचा सामना करावा लागतो. त्यातून सहीसलामत जर प्रवासी विमानतळावर पोहोचले,तर त्यांना तिथे अमेरिकी सैनिकांच्या प्रश्नांचा भडिमार सहन करून पुढे जावं लागतं. त्यामुळे सध्या अफगाणिस्तानमधून बाहेर पडण्यासाठी तालिबान आणि अमेरिकी सैनिक या दोन्ही घटकांचं समाधान करणं गरजेचं बनलं आहे.

हे वाचा -तालिबानच पाकिस्तानला काश्मीर जिंकून देईल, पाकिस्तानी नेत्यांची गुर्मी

इतर मार्ग बंद

अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यानंतर शेजारी देशांनी आपल्या सीमांवरून प्रवेश देणं पूर्णतः बंद केलं असून सीमेवरील सुरक्षा वाढवली आहे. तालिबाननेदेखील सीमेवरील सुरक्षा कडक केली आहे. त्यामुळे सीमा ओलांडून अफगाणिस्तान सोडणे, आता कुणालाही शक्य नाही. अफगाणिस्तानमधून बाहेर पडण्यासाठी समुद्राचा पर्याय नसल्यामुळे तोही पर्याय विचारात घेता येत नाही. केवळ हवाई मार्गे बाहेर पडणं शक्य असताना तीन विमानतळं तालिबानच्याच ताब्यात आहेत. त्यामुळे आता काबूलचं आंतरराष्ट्रीय विमानतळ हे एकमेव आशास्थान सर्वसामान्यांसाठी उरलं आहे.

First published:

Tags: Afghanistan, Airport, Taliban