मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

4 वर्षांमध्ये फक्त मादी कासवांचाच जन्म, प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर, संशोधक झाले परेशान!

4 वर्षांमध्ये फक्त मादी कासवांचाच जन्म, प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर, संशोधक झाले परेशान!

कोणत्याही प्रजातीत केवळ मादीच जन्माला आली तर चिंताजनक परिस्थिती निर्माण होऊ शकते. यामुळे

कोणत्याही प्रजातीत केवळ मादीच जन्माला आली तर चिंताजनक परिस्थिती निर्माण होऊ शकते. यामुळे

कोणत्याही प्रजातीत केवळ मादीच जन्माला आली तर चिंताजनक परिस्थिती निर्माण होऊ शकते. यामुळे

    मुंबई, 10 ऑगस्ट : जागतिक हवामान बदलामुळे (Global climate change) अनेक समस्या निर्माण होत आहेत. तापमान वाढ, अतिपाऊस, पूरस्थिती आदी गोष्टींमुळे मोठ्या नुकसानीला सामोरे जावं लागत आहे. जागतिक हवामान बदलाचा परिणाम माणसांप्रमाणेच शेती, पशु-पक्षी, जलचर प्राणी आदींवर होत आहे. जागतिक हवामान बदलाचा एक मोठा परिणाम नुकताच संशोधकांच्या दृष्टिपथात आलेला आहे. गेल्या चार वर्षांपासून नर समुद्री कासवांचा (Male Sea Turtle) जन्मदर (Birth Rate) लक्षणीय कमी झाला असून, मादी समुद्री कासवांचा जन्मदर वाढला आहे. जीव निर्माण होण्यासाठी नर आणि मादी अशा दोघांचीही गरज असते. परंतु, मादी कासवांची संख्या वाढत असताना नर कासवांची संख्या कमी होणं, हे कासवांच्या प्रजातीसाठी चिंताजनक ठरु शकतं, असं मत संशोधक व्यक्त करतात. अमेरिकेतील फ्लोरिडात (Florida) कासवांचं एक रुग्णालय आहे. सध्या या रुग्णालयातले संशोधक चिंतेत आहेत. कारण मागील चार वर्षापासून या भागात केवळ मादी कासवं जन्माला येत आहेत. कोणत्याही प्रजातीत केवळ मादीच जन्माला आली तर चिंताजनक परिस्थिती निर्माण होऊ शकते. यामुळे भविष्यात प्रजाती नष्ट देखील होऊ शकते. जागतिक हवामान बदल आणि तापमान वाढीमुळे (Rising Temperature) कासवांमध्ये हा बदल दिसून येत आहे. जर अशा पद्धतीनं केवळ मादी समुद्री कासवाची पिल्लं जन्माला येत राहिली तर ही प्रजाती वाढणं थांबू शकतं. हवामान बदल आणि तापमान वाढीमुळे कासवाच्या अंड्यात लिंग परिवर्तन (Gender change) होत आहे, असं मत संशोधकांनी व्यक्त केलं आहे. परंतु, या निष्कर्षावर अनेक मतभेद आहेत. परंतु, जागतिक हवामान बदलाचा फटका कासवांसह अन्य सजीवांना बसत आहे, ही गोष्ट मात्र खरी आहे, 'आज तक'ने याबाबत वृत्त आहे. (KBC जिंकल्यानंतर स्पर्धकाची दयनीय अवस्था, दारू सिगरेटमुळे बायकोही गेली सोडून) युनिव्हर्सिटी ऑफ एक्स्टरमधील इकॉलॉजिस्ट लूसी हॉक्स यांनी सांगितलं की, 'समुद्री कासवांच्या सात प्रजाती आहेत. तापमान वाढताच या प्रजाती मादी कासवांना जन्म देऊ लागतात. या सातही प्रजाती लैंगिक पक्षपाती आहेत. उष्णता वाढली नाही की ते लगेच अधिक मादी कासवांना जन्म देण्यास सुरुवात करतात,' असं लूसी हॉक्स यांनी सांगितलं. लूसी 2007 पासून या विषयाचा अभ्यास करत आहेत. यूएस नॅशनल ओशिएनिक अँड अ‍ॅटमॉस्फियरिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशनच्या म्हणण्यानुसार, जर समुद्री कासवांची अंडी 31 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त गरम वाळूमध्ये घातली गेली तर त्यातून मादी बाहेर पडणं निश्चित मानलं जातं. समुद्री कासवांमध्ये मुळातच नर संख्या कमी असते. जेव्हा 10 कासवांचा जन्म होतो, तेव्हा त्यात केवळ एक नर असतो. वाळू गरम होताच अंड्यांमध्ये लिंग बदलाची प्रक्रिया सुरू होते. याचाच अर्थ या अंड्यांमधून नर कासव बाहेर येत नाही. वाढत्या उष्णतेमुळे नर कासवांचा विकास थांबेल. नर अस्तित्वात राहिले नाहीत तर मादी कासव आपली प्रजाती वाचवू शकणार नाहीत. (क्या बात है! फ्रेशर्ससाठी IIT मध्ये फ्री कोर्सेस आणि Sony कंपनीत जॉबही; करा अर्ज) 'येत्या काही दशकांमध्ये समुद्री कासवांच्या प्रजातींमध्ये नर कासव जवळपास संपुष्टात येतील. नर कासवांची संख्या अगदी नगण्य असेल. जर नर अस्तित्वात नसतील तर कासवांमध्ये जेनेटिक व्हेरिएशन (Genetic variation) येणार नाही. जेनेटिक व्हेरिएशनसाठी नर कासवांचं अस्तित्व आवश्यक आहे,' असं कॉलेज ऑफ चार्ल्स्टनचे प्राध्यापक एमेरिटस आणि जीवशास्त्रज्ज्ञ डेव्हिड ओवेंस यांनी सांगितलं. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, 'लैंगिक संतुलन अत्यंत आवश्यक आहे. जर 90 टक्के माद्यांनी भरलेल्या घरट्यात प्रजनन सुरू झालं तर त्यात काही नर असणं गरजेचं आहे. पण तिथं नर नसतील तर प्रजातींचं प्रजनन कसं होणार, हा प्रश्नच आहे.' फ्लोरिडा येथील मॅरेथॉन शहरातल्या टर्टल रुग्णालयाचे मॅनेजर बीट जर्किलबॅश यांनी सांगितलं की, 'गेल्या चार उन्हाळ्यांपासून तापमानात वाढ दिसून येत आहे. आम्हाला गेल्या चार वर्षांपासून केवळ मादी समुद्री कासव दिसून येत आहेत. ही प्रक्रिया केवळ इथंच दिसत नसून जगभरात हा प्रकार दिसून येत आहे. 2018 मध्ये एका अभ्यास करण्यात आला होता, त्यात पूर्व ऑस्ट्रेलियात 99 टक्के कासव हे मादीच आहेत, असं म्हटलं होतं.' जागतिक हवामान बदल आणि तापमान वाढीमुळे एकूणच कासवांच्या प्रजाती धोक्यात आल्या आहेत, असं म्हणायला काहीच हरकत नाही.
    First published:

    पुढील बातम्या