अजब तर्क! पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादचं नाव 'इस्लामागुड' करण्यासाठी ऑनलाइन याचिका दाखल
पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादचं (Islamabad) नाव बदलण्यासाठी ऑनलाईन याचिका (Online petition) दाखल करण्यात आली आहे. यामध्ये इस्लामाबादचं नाव बदलून 'इस्लामागुड' (IslamaGood) ठेवण्यात यावं अशी मागणी केली आहे.
इस्लामाबाद, 21 फेब्रुवारी : गेल्या काही वर्षांपासून भारतात (India) विविध शहरांची नावं बदलण्यात आली आहेत. अलीकडेच उत्तर प्रदेशातील अल्लाहाबाद (Allahabad) या शहराचं नाव बदलून प्रयागराज (Prayagraj) ठेवण्यात आलं आहे. तसंच महाराष्ट्रातील औरंगाबाद (Aurangabad) शहराचं नामकरण 'संभाजीनगर' (Sambhajinagar) करण्याच्या मागणीनेही जोर धरला आहे. अशातच आता पाकिस्तानची (Pakistan) राजधानी इस्लामाबाद (Islamabad) या शहराचं नामकरण करण्याची मागणी समोर आली आहे.
खरंतर पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादचं नाव बदलण्यासाठी ऑनलाईन याचिका (Online Plea) दाखल करण्यात आली आहे. यामध्ये इस्लामाबादचं नाव बदलून 'इस्लामागुड' ठेवण्यात यावं अशी मागणी केली आहे. बांग्लादेशातील रहिवासी असलेल्या अयहम अबरार यांनी ही मोहीम राबविली आहे. या ऑनलाईन याचिकेला आतापर्यंत 300 लोकांनी पाठिंबा दिला आहे. Change.org या वेबसाइटवर अबरार यांनी लिहिलं की, 'इस्लाम हा चांगला धर्म आहे. पाकिस्तानात इस्लामवर प्रेम केलं जातं. मग 'इस्लामाबॅड' (IslamaBAD) असं नाव का? बांग्लादेशकडून खूप सारं प्रेम,' अशाप्रकराचा तर्क लावण्यात आला आहे. यावर आता संमिश्र प्रतिक्रिया उमठत आहेत.
There's a petition to change Islamabad's name to Islamagood because IslamaBad sounds Islamophobic. pic.twitter.com/IvOf4k9FlL
अबरारच्या या ऑनलाईन याचिकेवर आतापर्यंत 300 हून अधिक लोकांनी स्वाक्षरी केली आहे. तसंच ही याचिका आता पाकिस्तानच्या पंतप्रधानांनाही पाठवण्यात आली आहे. ट्वीटरवरही बर्याच लोकांनी आता यावर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. एका व्यक्तीनं लिहिलं की, 'याचा अर्थ इस्लाम-बॅड असा नाही, तर इस्लाम-आबाद असा आहे. '
पाकिस्तानातील इस्लामाबाद हे प्रत्यक्षात इस्लामचं शहर आहे. तर इस्लामाबाद हा शब्द दोन शब्दांच्या संयुगाने बनला आहे. इस्लाम आणि आबद असे दोन उर्दू शब्द आहेत. मोठ्या शहरांच्या नावानंतर आबाद हे रुपकं जोडलं जातं. शहरांच्या शेवटी 'आबाद' असणारी बरीच शहरं भारतात आहेत. अलीकडेच 2020 साली अमेरिकेच्या ओहियो येथे कोलंबसचे नाव बदलून 'फ्लेवर्डलँड' करण्याची मागणी Change.org वर करण्यात आली होती. या याचिकेला अनेकांनी पसंती दर्शवली होती.