वाचण्याची शक्यता होती फक्त एक टक्का; मात्र कोरोना रुग्णाने मृत्यूलाही दिला चकवा

वाचण्याची शक्यता होती फक्त एक टक्का; मात्र कोरोना रुग्णाने मृत्यूलाही दिला चकवा

डॉक्टरांनी तो जगेल याची आशाच सोडली, घरच्यांनीही त्याला निरोप द्यायची तयारी केली होती.

  • Share this:

ब्रिटन, 28 मे : कोरोनाव्हायरसवर अनेक रुग्ण मात करत आहेत. मात्र ब्रिटनमधील या बॉडीबिल्डरने कोरोनाविरोधात दिलेला लढा सर्वांना प्रेरणा देणारा आहे. कारण वाचण्याची शक्यता फक्त एक टक्का होती, तरी जगण्याच्या इच्छाशक्तीने या कोरोना रुग्णाने मृत्यूलाही चकवा दिला आहे. मृत्यूच्या दारातून तो परत आहे.

44 वर्षांचा स्टिव्ह बँकस बॉडीबिल्डर आहे. मिरर यूकेच्या रिपोर्टनुसार 25 मार्चला हा तो श्वासाची समस्या असल्याने रुग्णालयात दाखल झाला. त्याला हार्ट, किडनी आणि श्वसन समस्या निर्माण झाली होती, शिवाय सेप्सिसही होता. त्याची प्रकृती इतकी गंभीर झाली की तो कोमात गेला. ब्रुमफिल्ड हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल करण्यात आलं होतं. तेव्हापासून तो रुग्णालयात आहे. डॉक्टरांनी त्याला लाइफ सपोर्टवर ठेवलं होतं.

हे वाचा - देशातील 6 मेगासिटींचे कोरोनाने केले हाल; एकट्या महाराष्ट्रातील 3 शहरांची अवस्था

डॉक्टरांनी तो जगेल याची आशाच सोडली होती. त्याची जगण्याची शक्यता फक्त एक टक्का असल्याचं सांगितलं होतं. त्याच्या घरच्यांनीही त्याला निरोप द्यायची तयारी केली. मात्र या रुग्णानं हार मानली नाही. तब्बल 7 आठवड्यांनंतर त्याने आता डोळे उघडले.

रुग्णाची ही जगण्याची जिद्द पाहून त्याने डोळे उघडताच त्याच्या आजूबाजूला असलेल्या नर्स आणि डॉक्टरांकडून टाळ्यांचा कडकडाट झाला.

त्याची शरीरयष्टी आता ढासळली आहे. तो खूप बारीक झाला आहे. 2 महिने त्याच्या आयुष्यातील सर्वात कठीण असा काळ होता. तो मृत्यूच्या दारातून परत आला ही एखाद्याच्या चमत्कारापेक्षा कमी गोष्ट नाही.

हे वाचा - कोरोना विरोधात या 9 औषधांची भारतात केली जातेय चाचणी, काय आहेत त्यांची नावं?

First published: May 28, 2020, 9:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading