डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाचा धोका, खाजगी सुरक्षा रक्षक निघाला पॉझिटिव्ह

डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाचा धोका, खाजगी सुरक्षा रक्षक निघाला पॉझिटिव्ह

व्हाइट हाऊस हादरलं! ट्रम्प यांच्या खाजगी सुरक्षा रक्षकाला कोरोना, संपूर्ण ट्रम्प कुटुंबाची चाचणी करण्यात आली.

  • Share this:

वॉशिंग्टन, 08 मे : कोरोनानं जगभरात थैमान घातले आहे. अमेरिकेत परिस्थिती बिकट आहे. दरम्यान, या सगळ्यात व्हाइट हाउसच्या जवळ कोरोना येऊन पोहचला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा वैयक्तिक सेवक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. ही व्यक्ती अमेरिकेच्या नौदलातील असून ते राष्ट्राध्यक्षांच्या वैयक्तिक सेवेत तैनात होता. याबाबत व्हाइट हाऊसने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले गेले आहे की काळजी करण्याची कोणतीही गोष्ट नाही, परंतु ट्रम्प यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. या घटनेनंतर ट्रम्प म्हणाले की, आजपासून मी रोज कोरोना चाचणी करणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती सैन्याच्या एका एलिट युनिटचा भाग आहे जी राष्ट्राध्यक्षांच्या कुटूंबाची काळजी घेते. हे युनिट बहुतेक वेळा अध्यक्ष आणि त्यांच्या कुटुंबाच्या अगदी जवळ काम करते. असे सांगितले जात आहे की, वैयक्तिक नोकरांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आल्यानंतर ट्रम्प यांनीही खूप संताप व्यक्त केला. व्हाइट हाऊसने जारी केलेल्या निवेदनात, आम्हाला मेडिकल युनिटमधून कळले आहे की ट्रम्प कुटुंबासह वैयक्तिक नोकर म्हणून काम करणाऱ्या अमेरिकन सैन्यातील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. यानंतर राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्षांचीही चाचणी घेण्यात आली असून दोघांचेही रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

वाचा-धोकादायक इशारा! मे महिन्यात आणखी वाढू शकतो कोरोनाचा कहर

काय काम करते ही व्यक्ती

सीएनएनच्या म्हणण्यानुसार, संसर्ग झालेली व्यक्ती राष्ट्रपतींच्या वैयक्तिक कामात मदत करत होता. राष्ट्रपतींच्या अन्नाची व्यवस्था करण्याची जबाबदारी त्यांची होती. ते बहुतेक वेळा त्यांच्या भेटीदरम्यान राष्ट्राध्यक्षांसोबत असतात. या व्यक्तीमध्ये बुधवारी कोरोना संसर्गाची चिन्हे दिसू लागली, त्यानंतर वैद्यकीय युनिटची स्का टेस्ट झाली आणि त्यांना संसर्ग झाल्याचे दिसून आले. तज्ञांचे म्हणणे आहे की व्हाइट हाऊसच्यापर्यंत संसर्ग पोहोचणे ही चांगली बातमी नाही. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांसाठी एक चाचणी घेण्यात येत आहे. ही व्यक्ती कोठून संक्रमित झाली हेही तपासले जात आहे.

वाचा-कोरोना रोखण्यासाठी बेघरांमध्ये दारू, तंबाखू आणि अमली पदार्थांचे वाटप

First published: May 8, 2020, 8:09 AM IST

ताज्या बातम्या