Home /News /videsh /

न्यूयॉर्कमध्ये कोरोनामुळे दर 17व्या मिनिटाला एकाचा मृत्यू, सुन्न झालं शहर

न्यूयॉर्कमध्ये कोरोनामुळे दर 17व्या मिनिटाला एकाचा मृत्यू, सुन्न झालं शहर

जस जसा कोरोना रुग्णांचा अभ्यास होत जाईल तसं नवीन माहिती उपलब्ध होणार आहे. त्याप्रमाणे जगभरातल्या डॉक्टरांनी आपली उपचाराची दिशा ठरवली पाहिजे असा सल्लाही डॉक्टरांनी दिलाय.

जस जसा कोरोना रुग्णांचा अभ्यास होत जाईल तसं नवीन माहिती उपलब्ध होणार आहे. त्याप्रमाणे जगभरातल्या डॉक्टरांनी आपली उपचाराची दिशा ठरवली पाहिजे असा सल्लाही डॉक्टरांनी दिलाय.

आत्तापर्यंत 450 जणांचा मृत्यू झाला असू 27 हजार बाधित आहेत. सगळी आरोग्य यंत्रणाच कोसळून पडली आहे.

  न्यूयॉर्क 28 मार्च :  जगाच्या आकर्षणाचं केंद्र असलेलं न्यूयॉर्क सध्या सुन्न आहे. अमेरिकेची आर्थिक राजधानी असलेल्या या शहरात सध्या भयाण शांतता आहे. कोरोनाने शहरात थैमान घातलं असून दर 17 व्या मिनिटाला एकाचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आलीय. सगळी हॉस्पिटल्स कोरोना रुग्णांनी भरून गेली आहेत. नवे पेशंट्स दाखल करून घ्यायला आता बेड्सही शिल्लक राहिले नाहीत. परिस्थिती अशीच राहीली तर हे शहर उद्धवस्त होईल अशी भीती न्यूयॉर्कच्या महापौरांनी व्यक्त केलीय. शुक्रवारी एकाच दिवशी 85 जणांचा मृत्यू झाला होता. आत्तापर्यंत 450 जणांचा मृत्यू झाला असू 27 हजार बाधित आहेत. सगळी आरोग्य यंत्रणाच कोसळून पडली आहे. काम करायला स्वयंसेवक नाहीत. त्यामुळे तातडीने लष्कराला पाचारण केलं पाहिजे असं मत न्यूयॉर्कचे महापौर बिल डे ब्लासियो  यांनी व्यक्त केलंय. शहराची सर्व परिस्थिती मी व्हाईट हाऊसला सांगितली आहे त्यांनी लवकर निर्णय घ्यावा असंही ते म्हणाले. आपल्यासारखा विकसनशील देश म्हणून जवळच्या वाटणाऱ्या ब्राझीलमध्ये Coronavirus सारख्या जागतिक संकटाच्या काळातही राजकारणाची चिखलफेक पाहायला मिळते आहे. त्यात थेट राष्ट्राध्यक्ष विरुद्ध प्रांतांचे गर्व्हर्नर असा सामना आहे. "लोकांची गर्दी होते आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणं शक्य होत नाही म्हणून आपल्या देशाला उत्पादनं बंद करणं परवडणारं नाही.

  अमेरिकेत 24 तासांत 18 हजार लोकांना कोरोनाची लागण तर 345 लोकांचा मृत्यू

  आता काही लोक मरणारच, त्याबद्दल दुःख आहे. पण गाडीचे अपघात होतात म्हणून आपण कार फॅक्टरी बंद करू शकत नाही", असं धक्कादायक विधान ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जाइर बोल्सोनारो यांनी केलं आहे.

  कोरोनाशी लढा देता देता डॉक्टर धारातीर्थी, 5000 कोरोना पॉझिटिव्ह

  ब्राझीलच्या साओ पावलोमध्ये कोरोनाव्हायरची साथ मोठ्या प्रमाणआवर पसरली आहे आणि हाच प्रांत ब्राझीलचं आर्थिक केंद्र आहे. शुक्रवारी ब्राझीलमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 3417 वर पोहोचली आहे. देशात कोरोनाव्हायरसने 82 लोकांचा जीव गेला आहे. या आकड्यांच्या सत्यतेबद्दल राष्ट्राध्यक्षांनीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. काही जण परिस्थितीचा फायदा उठवत राजकीय खेळी करायचा प्रयत्न करत असल्याचा त्यांनी आरोप केला.
  Published by:Priyanka Gawde
  First published:

  पुढील बातम्या