चांद नवाबलाही विसराल, पाकिस्तानच्या रिपोर्टरचा जगभरात VIDEO VIRAL

चांद नवाबलाही विसराल, पाकिस्तानच्या रिपोर्टरचा जगभरात VIDEO VIRAL

पाकिस्तानच्या या रिपोर्टरची का होतेय चर्चा वाचा सविस्तर.

  • Share this:

लाहोर, 28 जून : एकीकडे सलग 21 दिवस इंधन वाढीचा भडका उडत असतानाच आता आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर चांद नवाबलाही मागे टाकेल असा एक भन्नाट व्हिडीओ पाहून पोट धरून हसायला आल्याशिवाय राहणार नाही.

इंधनाचे दर वाढल्यामुळे गाडी चालवणं परवडत नाही आणि घोडा महाग असल्यानं आता पाकिस्तानात गाढव गाडी चालत असल्याचं पाहायला मिळालं आहे. या गाढवाचा चारा परवडणारा आणि ट्रॅफिक पोलीसही अडवत नसल्याचं टांगेवाल्याचं म्हणणं आहे.

पाकिस्तानमध्ये गाढवांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आता लाहोरमध्ये प्रवासी घेऊन जाण्यासाठीही याचा उपयोग केला जात आहे. त्याचे नाव चिंगची गडगड आहे. पाकिस्तान न्यूज चॅनल जिओ न्यूजनेही त्याचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला. व्हिडिओमध्ये लोक म्हणतात की चिंगची गडगड्यांनी पुन्हा टांग्याच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

एका पाकिस्तानी महिलेचे म्हणणे आहे की पेट्रोलचे दर कमी करावेत अन्यथा लोक इंधन परवडत नसल्यानं पेट्रोलऐवजी वाहनाला गाढव बांधण्यास सुरुवात करतील. या संपूर्ण घटनेचं पाकिस्तानच्या रिपोर्टनं केलेलं कव्हरेज इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा तुफान व्हायरल झालं आहे.

संपादन- क्रांती कानेटकर

First published: June 28, 2020, 2:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading