बिजिंग, 15 ऑगस्ट: बैरूतमधील स्फोटातून सावरत असतानाच आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चीनमध्येही मोठ्या प्रमाणत स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे. या स्फोटाची भीषणता एवढी होती की कित्येक किलोमीटपर्यंत घराच्या काचा फुटल्या, परिसरात धुराचं साम्राज्य पसरलं होतं. या स्फोटात जीवितहानी झाल्याची अद्याप माहिती समोर आली नाही.
चीनी मीडियानं दिलेल्या वृत्तानुसार भीषण स्फोट झाला आहे. बैरुत प्रमाणेच हा स्फोट मोठा असल्याचं सांगितलं जात आहे. चीनच्या शांडोंगे प्रांतांतील एका बाजार हा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या स्फोटामुळे आजूबाजूच्या परिसरातील घरांचे छप्पर उडून गेले. मोठ्या प्रमाणात काचा फुटल्या आणि घर, दुकानांचं नुकसान झालं आहे.
#Breaking: An explosion occurred near a market in Jining, East China's Shandong Province on Saturday morning. Casualty unknown. pic.twitter.com/XPgYy0kCHt
The explosion occurred at an agricultural storage site. A preliminary investigation suggests that villagers may have accidentally damaged electric wiring during woodcutting, which led to a fire that triggered the explosion: local authority https://t.co/7FgDueAqYa
य़ा व्हिडीओमध्ये स्फोटाचा भयंकर आवाज येत आहे. यात आपण पाहू शकता धुराचा लोळ पसरला आहे. परिसरात असणाऱ्या गाड्या, घरं आणि दुकानांचं मोठं नुकसान झालं आहे. ग्लोबल टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार अद्याप जीवितहानी झाल्याची कोणतीही माहिती मिळू शकली नाही. मात्र परिसरात रेक्यू ऑपरेशन सुरू आहे.या स्फोटादरम्यान जे लोक जखमी झाले आहेत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
काही दिवसांपूर्वी लेबनानची राजधानी बैरूद इथे असाच भीषण स्फोट झाला होता. या स्फोटात 178 जणांनी प्राण गमावले होते. 6 वर्षांपासून 2, 750 टन अमोनियम नायट्रेटचा साठा ठेवलेल्या ठिकाणी हा स्फोट झाला होता.