मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

Bubonic plague: ब्यूबॉनिक प्लेगमुळे एकाचा मृत्यू, कोरोनापेक्षाही भयंकर झाली रुग्णाची अवस्था

Bubonic plague: ब्यूबॉनिक प्लेगमुळे एकाचा मृत्यू, कोरोनापेक्षाही भयंकर झाली रुग्णाची अवस्था

कोरोनापेक्षाही भयंकर आहे ब्यूबॉनिक प्लेग, 14 दिवसात अशी झाली 15 वर्षीय रुग्णाची अवस्था.

कोरोनापेक्षाही भयंकर आहे ब्यूबॉनिक प्लेग, 14 दिवसात अशी झाली 15 वर्षीय रुग्णाची अवस्था.

कोरोनापेक्षाही भयंकर आहे ब्यूबॉनिक प्लेग, 14 दिवसात अशी झाली 15 वर्षीय रुग्णाची अवस्था.

  • Published by:  Priyanka Gawde
बीजिंग, 17 जुलै : कोरोनाव्हायरस (Coronavirus)या अदृश्य रोगाशी सारं जग दोन हात करत असताना आता आणखी एक रोगाची चाहुल लागली आहे. या आजाराने आधीच जगातील कोट्यवधी लोकांचा मृत्यू झाला आहे. या आजारामुळं 5 कोटी लोकांचा मृत्यू झाला. आता पुन्हा एकदा हा रोग चीनमध्ये पसरत आहे. याला काळा मृत्यू (Black death) असेही म्हणतात. या आजाराचे नाव ब्यूबॉनिक प्लेग (Bubonic plague) आहे. चीनमध्ये ब्यूबॉनिक प्लेगचा प्रसार होण्याचा धोका वाढत आहे. चीनच्या इनर मंगोलियन स्वायत्त प्रदेश परिसरात प्लेगचे प्रमाण वाढत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम मंगोलियामध्ये प्लेगमुळे 15 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. या मुलाच्या संपर्कात आलेल्या 15 लोकांचा क्वारंटाइन करण्यात आले आहे. तर, अमेरिकेच्या कोलोराडोमध्येही एक खार कोरोना पॉझिटिव्ह सापडली आहे. वाचा-कोरोना लशीची माहिती हॅक करण्याचा केला जात आहे प्रयत्न, 'या' देशावर आरोप डेली मेलच्या रिपोर्टनुसार, चीनच्या आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. मंत्रालयाचे प्रवक्ते नरगरेल दोरज यांनी दिलेल्या माहितीनुसार, इतर दोन मुलांनीही मार्मट (उंदीरसारखे प्राणी) खाल्ले, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गोबी-अल्ताई प्रांतातील प्रत्येकाला क्वारंटाइन राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. मंगोलिया सरकारने लोकांना इशारा दिला असून त्यांनी मार्मट या प्राण्याचे मांस न खाण्याचे आवाहन केले आहे. चिनी बातमी एजन्सी सिन्हुआच्या म्हणण्यानुसार, बुबोनिक प्लेगची लागण झालेल्या दुसर्‍या रुग्णाची प्रकृती सुधारत आहे. ब्यूबॉनिक प्लेगचे जीवाणू बहुतेक उंदरांद्वारे पसरतात, परंतु चीनमध्ये हा गिलहरी सारखा जीव मरमात पसरतो. हा जीव बहुधा मंगोलिया आणि उत्तर आशियामध्ये आढळतो. वाचा-मधुमेह नसलेल्यांच्या ब्लड शुगरवर CORONAVIRUS परिणाम करतो? असा पसरतो ब्यूबॉनिक प्लेग हा रोग मुख्यत: जंगली उंदरांमध्ये आढळणार्‍या बॅक्टेरियांमुळे होतो. या बॅक्टेरियाचे नाव येरसिनिया पेस्टिस बॅक्टेरियम (Yersinia Pestis Bacterium) आहे. हा जीवाणू शरीरातील लिम्फ नोड्स, रक्त आणि फुफ्फुसांवर हल्ला करतो. यामुळे बोटं काळी पडतात व सडतात. ब्यूबॉनिक प्लेग प्रथम जंगली उंदरांना होतो. उंदरांच्या मृत्यूनंतर या प्लेगचे जीवाणू मानवी शरीरात प्रवेश करतात. उंदरांच्या मृत्यूनंतर दोन ते तीन आठवड्यांनंतर मानवामध्ये प्लेग पसरतो. जगभरात ब्यूबॉनिक प्लेगची सुमारे 3248 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्यापैकी 584 लोकांचा मृत्यू झाला आहे. या वर्षांमध्ये, बहुतेक प्रकरणे डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, मेडागास्कर, पेरूमध्ये आढळून आली. वाचा-मोठी बातमी! देशात पहिल्यांदा COVAXIN चं ह्युमन ट्रायल; तरुणाला दिला पहिला डोस
First published:

पुढील बातम्या