मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

ऐकावं ते नवलच ! या देशामध्ये मृत व्यक्तीशीही करता येतं लग्न

ऐकावं ते नवलच ! या देशामध्ये मृत व्यक्तीशीही करता येतं लग्न

मृत व्यक्तीशी लग्न करण्याच्या पद्धतीला इंग्रजीत नेक्रोगेमी म्हणतात. पहिल्या महायुद्धापासून ही प्रथा सुरू झाली. जाणून घेऊया कसं होतं हे अजब लग्न

मृत व्यक्तीशी लग्न करण्याच्या पद्धतीला इंग्रजीत नेक्रोगेमी म्हणतात. पहिल्या महायुद्धापासून ही प्रथा सुरू झाली. जाणून घेऊया कसं होतं हे अजब लग्न

मृत व्यक्तीशी लग्न करण्याच्या पद्धतीला इंग्रजीत नेक्रोगेमी म्हणतात. पहिल्या महायुद्धापासून ही प्रथा सुरू झाली. जाणून घेऊया कसं होतं हे अजब लग्न

  • Published by:  Amruta Abhyankar

मुंबई, 30 नोव्हेंबर: फान्स हा देश मोकळ्या आणि प्रगत विचारांसाठी ओळखला जातो. तिथं इतका मोकळेपणा आहे की एखादी व्यक्ती मरण पावलेल्या आपल्या प्रियकर किंवा प्रेयसीशी लग्न करू शकते. फक्त सरकारी अधिकारी, मृत व्यक्तीचे नातेवाईकांच्या परवानगी नंतर हे लग्न होतं.

कुठे, कशी सुरू झाली ही पद्धत?

मृत व्यक्तीशी लग्न करण्याच्या पद्धतीला इंग्रजीत नेक्रोगेमी म्हणतात. 19 व्या शतकापासून ही प्रथा सुरू आहे. फ्रान्समधील सिव्हिल कोडमधील कलम 171 अनुसार दीर्घकाळ सहवासात असलेली व्यक्ती अचानक मरण पावली तर जिवंत व्यक्ती त्या मृत व्यक्तीशी लग्न करू शकते. त्यासाठी अध्यक्षांची परवानगी घ्यावी लागते. पहिल्या महायुद्धापासून युरोपात ही प्रथा सुरू झाली. लग्नाआधी गरोदर राहिलेल्या महिलेचा होणारा पती जर युद्धात मरण पावला तर त्या होणाऱ्या बाळाला वडिलांचं नाव लावता यावं म्हणून त्या मुलींच मृत जवानाशी लग्न लावून दिलं जायचं. 1959 मध्ये फ्रान्समधील एक पूल बांध तुटल्यामुळे 423 जणांचा मृत्यू झाला होता. यातील मृतांपैकी एकाचा काही दिवसांपूर्वी साखरपुडा झाला होता. त्याच्या वाग्दत्त वधूने त्याच्याशीच लग्न करायची इच्छा सरकारकडे व्यक्त केली. फ्रान्सचे तत्कालीन अध्यक्ष चार्ल्स दी गॉले यांनी मृत व्यक्तीशी लग्न करण्याची परवानगी दिली होती. या निर्णयाचं खूप कौतुक झालं. त्यानंतरच फ्रान्सच्या संसदेने त्यासंबंधी कायदा केला.

या लग्नासाठी काय करावं लागतं?

मृत व्यक्तीशी लग्न करायची इच्छा आहे तिला हे सिद्ध करावं लागतं की मेलेल्या व्यक्तीला तिच्याशीच लग्न करायचं होतं. मयताच्या नातेवाईकांची परवानगी, मित्रांचे जबाब हे सरकारी अधिकाऱ्यांकडे नोंदवले जातात जेणेकरून कुणी गैरफायदा घेऊ नये. जिवंत माणसांच्या लग्नाप्रमाणेच मयताच्या फोटोसोबत सगळे विधी करून हे लग्न थाटात केलं जातं. सरकार लग्नाची तारीख मयत जिवंत असतानाची नोंदवतं जेणेकरून पुढच्या सरकारी कारभारात अडथळा येऊ नये. डेथ सर्टिफिकेटही व्यवस्थित राहतं.  संपत्तीसाठीही एखादी व्यक्ती लग्न करू शकते त्यामुळे सरकार खूप सतर्कपणे सर्व गोष्टी तपासून पाहतं. त्याउपर लग्नानंतरही मेलेल्या व्यक्तीची संपत्ती लग्न करणाऱ्या जिवित व्यक्तीला न मिळता विडो पेन्शन मिळेल याची दक्षताही फ्रान्सचं सरकार घेतं. लग्नानंतर जर मुलीला मयत व्यक्तीचं आडनाव तिच्या नावासमोर लावायचं असेल तर ती लावू शकते.

दक्षिण कोरिया, जपान, चीनमध्येही होतात अशी लग्न

दक्षिण कोरियात 1983 मध्ये एका बिझनेसमनचा मुलगा ह्युंग जिन मून याचं लग्न काही दिवसांवर असतानाच त्याचा अपघाती मृत्यू झाला. त्याच्या वाग्दत्त वधूने त्याच्याशी मरणोत्तर लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. विवाहित व्यक्तीला मेल्यावर स्वर्गात स्थान मिळतं अशी कोरियातील श्रद्धा आहे. त्याच देशातल्या एका बॉक्सरच्या मृत्यूनंतर त्याच्या प्रेयसीने त्याच्याशी लग्न केलं होतं. कोरियात आजही अशी श्रद्धा आहे की आत्म्याशी लग्न केलेली व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी लग्न करण्याचा विचार करत नाही. चीनमध्ये आत्म्याशी लग्न करण्याच्या पद्धतीला मिंगहून म्हणतात. जपानचा ओकिनावा प्रांत चीनला लागूनच आहे त्यामुळे तिथंही ही प्रथा अस्तित्वात आहे.

First published:

Tags: France