• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • Amazon च्या डिलिव्हरी बॉयचा on duty रोमान्स! Van चा व्हिडिओ होतोय Viral

Amazon च्या डिलिव्हरी बॉयचा on duty रोमान्स! Van चा व्हिडिओ होतोय Viral

लोकांना घरपोच वस्तू पुरवण्याची सेवा देणाऱ्या (On duty romance of Amazon delivery boy video goes viral) अमेझॉनच्या डिलिव्हरी बॉयसोबत असणारी एक तरुणी कंपनीच्या व्हॅनमधून उतरत असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

 • Share this:
  लोकांना घरपोच वस्तू पुरवण्याची सेवा देणाऱ्या (On duty romance of Amazon delivery boy video goes viral) अमेझॉनच्या डिलिव्हरी बॉयसोबत असणारी एक तरुणी कंपनीच्या व्हॅनमधून उतरत असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. कोरोना काळात ऑनलाईन ऑर्डर (Online orders increased during corona) करणाऱ्यांचं प्रमाण कमालीचं वाढलं आहे. अनेकांना बाजारपेठेत जाऊन वस्तू खरेदी करण्यापेक्षा त्या ऑनलाईन मागवण्याची सवय झाली आहे त्यामुळे अशी सेवा देणाऱ्या अमेझॉनसारख्या कंपन्यांच्या व्यवसायात वाढ होत आहे. शेजाऱ्याने टिपला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ आहे फ्लोरिडामधील. या व्हिडिओत अमेझॉनची एक डिलिव्हरी व्हॅन रस्त्याच्या कडेला येऊन थांबलेली दिसते. या व्हॅनचा दरवाजा उघडतो. अमेझॉनचा डिलिव्हरी बॉय स्वतः हा दरवाजा पकडतो आणि त्यातून एक तरुणी खाली उतरल्याचं दिसतं. आता ऑन ड्युटी असणाऱ्या डिलिव्हरी बॉयच्या व्हॅनमध्ये डिलिव्हर करण्यासाठीच्या गोष्टींव्यतिरिक्त ही मुलगी काय करत होती, असा प्रश्न नेटिझन्स विचारत आहेत. शेजाऱ्याने टिपला व्हिडिओ ज्या अपार्टमेंटपाशी ही व्हॅन थांबली, तिथं राहणाऱ्या एका नागरिकाने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. या व्हिडिओत व्हॅनमधून तरुणी उतरते आणि स्वतःच्या खिशातील मोबाईल काढत निघून जात असल्याचं दिसतं. अमेझॉनची डिलिव्हरी यायला आजकाल उशीर का होतो, हे हा व्हिडिओ पाहिल्यावर कळतं, असा टोमणादेखील या नागरिकाने मारला आहे. हे वाचा- केवळ 11 हजारात घरी आणा सर्वाधिक मायलेज देणारी कार; Maruti Celerio खरेदीची संधी अमेझॉनने केली कारवाई अमेझॉनने या कर्मचाऱ्यावर कारवाई करत त्याला तातडीने कामावरून काढून टाकल्याचं म्हटलं आहे. हे वागणं अमेझॉनच्या संकेतांना आणि शिष्टाचाराला धरून नसल्याचं सांगत त्यांनी कर्मचाऱ्यावर कारवाई केल्याचं जाहीर केलं आहे. इतर कर्मचाऱ्यांनादेखील इशारा देण्यात आला असून अशा प्रकारांना माफ केलं जाणार नसल्याचं सांगत नागरिकांचा राग शमवण्याचा प्रयत्न केला आहे. सोशल मीडियावर मात्र हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
  Published by:desk news
  First published: