Home /News /videsh /

निर्दयीपणाची हद्द झाली! पर्यटकांना पाहून बछडा पळू नये म्हणून तोडले पाय

निर्दयीपणाची हद्द झाली! पर्यटकांना पाहून बछडा पळू नये म्हणून तोडले पाय

सिंबासोबत क्रौर्याची परिसीमा ओलांडणाऱ्याविरोधात कठोर कारवाई करण्याचं आश्वासन पुतीन यांनी दिलं आहे.

    मॉस्को, 11 जून : गेल्या काही दिवसांपासून प्राण्यावरील अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. केरळमध्ये गर्भवती हत्तीणीला स्फोटकं खायला दिल्यानंतर कुत्रे आणि गायींवरील अत्याचार आणि त्यानंतर आता बछड्याला दिलेली निर्दयीपणाची वागणूक. रशियात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. पर्यटकांना भुरळ घालण्यासाठी आणि फोटो काढताना छावा पळून जाऊ नये म्हणून बछड्याचे दोन पाय तोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या बछड्याला दोन्ही पायांना गंभीर इजा झाल्यानं त्याला उठता येत नाही. त्यामुळे पर्यटक या बछड्याशेजारी येऊन मनसोक्त सेल्फी काढू शकतात या उद्देशानं हे निर्दयी कृत्य केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. हे वाचा- नवभारत टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार सिंबा नावाच्या या बछड्याची दिवसेंदिवस प्रकृती खालवत चालली आहे. त्याच्या मणक्याला गंभीर जखम झाली आणि त्याला अनेक दिवस उपाशी ठेवल्याची माहिती ही या बछड्याचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या युलिया अगिवा यांनी दिली आहे. त्यांनी या बछड्याला डॉक्टरांकडे उपचारासाठी नेलं. अनेक छायाचित्रकार किंवा पर्यटकांना पाहण्यासाठी बऱ्याचदा अशाप्रकारे प्राण्यांची हाडं मोडतात याचं कारण ते माणसांना पाहून घाबरून पळून जाऊ नयेत हे असतं. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी दिले चौकशीचे आदेश सिंबासोबत क्रौर्याची परिसीमा ओलांडणाऱ्याविरोधात कठोर कारवाई करण्याचं आश्वासन पुतीन यांनी दिलं आहे. त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चौकशीचे आदेशही दिले आहेत. हे वाचा- संपादन- क्रांती कानेटकर
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Russia, Russia's Putin, Russian tourist

    पुढील बातम्या