मराठी बातम्या /बातम्या /विदेश /OMG : 67 वर्षांपासून आंघोळ न केलेला जगातील सर्वात घाणेरडा माणूस!

OMG : 67 वर्षांपासून आंघोळ न केलेला जगातील सर्वात घाणेरडा माणूस!

अगदी नुसत्या कल्पनेनंही डोळ्यासमोर अनेक चित्रं उभे राहतील अशा या 67 वर्षांपासून आंघोळ न करणाऱ्या व्यक्तींचं नाव आहे, अमो हाजी. ते इराणमध्ये (Iran) राहतात.

अगदी नुसत्या कल्पनेनंही डोळ्यासमोर अनेक चित्रं उभे राहतील अशा या 67 वर्षांपासून आंघोळ न करणाऱ्या व्यक्तींचं नाव आहे, अमो हाजी. ते इराणमध्ये (Iran) राहतात.

अगदी नुसत्या कल्पनेनंही डोळ्यासमोर अनेक चित्रं उभे राहतील अशा या 67 वर्षांपासून आंघोळ न करणाऱ्या व्यक्तींचं नाव आहे, अमो हाजी. ते इराणमध्ये (Iran) राहतात.

मुंबई, 21 जानेवारी : सकाळी उठल्यानंतर घरातून बाहेर पडण्यापूर्वी किंवा घरातही कोणतं काम करण्यापूर्वी आंघोळ (Bath) करणं ही अगदी स्वाभाविक सवय आहे. आंघोळ केल्यानंतर शरीर स्वच्छ आणि  मन ताजेतवाने होते.  कामाची प्रसन्न सुरुवात होते. थंडीच्या दिवसात अंघोळ करणं अनेकांच्या जीवावर येतं. त्यामुळे ती मंडळी एखाद्या दिवशी अंघोळीला दांडी मारतात. त्यांचा हा आंघोळीचा आळस एकवेळेस ठीक आहे. पण, एका 87 वर्षांच्या वृद्ध व्यक्तीनं गेल्या 67 वर्षांपासून आंघोळच केली नसल्याचा विचित्र प्रकार समोर आला आहे.

काय आहे कारण?

अगदी नुसत्या कल्पनेनंही डोळ्यासमोर अनेक चित्रं उभे राहतील अशा या 67 वर्षांपासून आंघोळ न करणाऱ्या व्यक्तींचं नाव आहे, अमो हाजी. (Amou Haji) ते इराणमध्ये (Iran) राहतात. याबाबत इराणमधील तेहरान टाईम्सनं (Tehran Times) दिलेल्या वृत्तानुसार ‘ 'शरीर स्वच्छ केलं तर आजारी पडू’ अशी हाजी यांना भीती आहे. त्यामुळे त्यांना पाण्याचा तिटकारा आहे. त्यामुळे ते आराम करण्यासाठी अस्वच्छ आणि घाण वास येत असलेली जागा निवडतात.

ही एकच विचित्र सवय नाही!

हाजी यांना अंघोळ न करण्याची एकच विचित्र सवय नाही. त्यांना ताजं अन्न खाण्यासही आवडत नाही. इतकंच नाही तर जनावरांचा मळ तंबाखू सारखा पाईपमध्ये भरून ओढायला त्यांना आवडतं.

हाजी हे दिवसातून पाच लीटर पाणी पितात. ते वाढलेले केस जाळून टाकतात. त्याचबरोबर एका हेल्मेटच्या मदतीनं थंडीच्या दिवसात स्वत:चं शरीर गरम करण्याचा प्रयत्न करतात. या हेल्मेटचा उपयोग युद्धाच्या काळात केला जात असे.

या सवयी का लागल्या?

हाजी यांना या सर्व विचित्र सवयी का लागल्या? हा प्रश्न कुणालाही पडणं स्वाभाविक आहे. त्यांच्या आयुष्यात घडलेल्या काही गोष्टींमुळे ते संपूर्ण बदलले, आणि या पद्धतीनं जगू लागले, अशी माहिती इराणमधील माध्यमांनी दिली आहे. आता हाजी त्यांच्या या घाणेरड्या आयुष्यात आनंदी आहेत. त्यांना जगातील सर्वात घाणेरडा माणूस (worlds most dirtiest man ) असं म्हंटलं जातं. त्याचीही त्यांनी फिकीर नाही.

First published:
top videos

    Tags: Iran