Home /News /videsh /

कोरोनाबाबत माहिती लपवल्यास होणार 1 वर्षाचा तुरुंगवास आणि 2 लाख दंड, या देशाने केले नियम कडक

कोरोनाबाबत माहिती लपवल्यास होणार 1 वर्षाचा तुरुंगवास आणि 2 लाख दंड, या देशाने केले नियम कडक

कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता सर्व देशांनी आपले नियम कडक केले आहेत.

    मस्कट, 30 मार्च : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता सर्व देशांनी आपले नियम कडक केले आहेत. कोरोनाबाबत माहिती लपवल्यास काही देशांमध्ये दंड आकारण्यात येत आहे. आता ओमानने तर, कोरोना विषाणूंमुळे पीडित देशातील नागरिक आणि परदेशी नागरिकांनी तातडीने आरोग्य मंत्रालयाला कळवावे. जर कोणी माहिती लपवली तर त्याला 1 वर्षांचा तुरुंगवास आणि तब्बल 2 लाख दंड बसेल, असे सांगण्यात आले आहे. ओमनमध्ये 167 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे, मात्र सुदैवाने अद्याप कोणाचाही मृत्यू झालेला नाही. त्यामुळं हीच परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी नियम कठोर करण्यात येत आहेत. 'उर्दू न्यूज'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, हा नियम परदेशातून आलेल्या लोकांनाही लागू असेल. त्याचबरोबर असेही म्हटले आहे की कोरोना विषाणू पीडितेने उपचार करण्यास नकार दिल्यास किंवा डॉक्टरांचा सल्ला न मानल्यास त्याला एक वर्षाची शिक्षा आणि दहा हजार रियाल दंड भरावा लागेल. वाचा-अमेरिकेत कोरोनामुळे जाऊ शकतात 2 लाख जीव; दोन आठवड्यात आकडा वाढण्याचं कारण आलं समोर जे दुकाने बंद करणार नाहीत त्यांनाही होणार शिक्षा असेही म्हटले आहे की जो कोणी हा संसर्गजन्य रोग जाणूनबुजून इतरांना संक्रमित करतो त्यालाही याच शिक्षेचा सामना करावा लागेल. सर्वांना समान दंड व एक वर्षाची शिक्षा भोगावी लागेल. त्याचबरोबर ओमानच्या सांस्कृतिक मंत्रालयाचे म्हणणे आहे की देशभरातील 40 प्रमुख हॉटेल आरोग्य मंत्रालयाच्या देखरेखीखाली आहेत. ही हॉटेल्स आपत्कालीन परिस्थितीत आणि गरजेनुसार आरोग्य मंत्रालयाला सुमारे दोन हजार खोल्या देतील. या खोल्या लोकांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यासाठी वापरल्या जाणार आहेत. याशिवाय जी लोकं आपली दुकाने बंद करणार नाहीत, त्यांनाही दंड बसणार आहे. वाचा-भारतात WhatsApp युजर्सवर निर्बंध, कोरोनामुळे आता वापरावर अशा मर्यादा जगात कोरोनाचा हाहाकार जगभरात कोरोना व्हायरसमुळे तब्बल 34 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. सर्वात जास्त इटली 10 हजारहून अधिकांचा मृत्यू झाला आहे. आता इटलीनंतर अमेरिकेतही कोरोनाचा धोका वाढल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात कोरोनाचा सर्वात जास्त धोका आहे. मागच्या तीन दिवसांमध्ये नव्या रुग्णांच्या संख्येत तीनपटीनं वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. 19 राज्यांमध्ये सरासरी 1 हजार रुग्ण आढळले असल्याची माहिती मिळते.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या