वॉशिंग्टन, 23 जानेवारी: अमेरिकेत (
America) कोरोनामुळे (
Corona) रिअल इस्टेट (
Real Estate) क्षेत्राचं गणितच बदलून गेल्याचं चित्र दिसू लागलं आहे. वॉशिंग्टन आणि न्यूयॉर्कसह (
Washington and Newyork) अमेरिकेतील अनेक भागातील जुनी कार्यालयं (Old
offices) आता घरांमध्ये (
Homes) रुपांतरित (
Converted) करण्यात येत आहेत. अमेरिका सरकारच्या न्यायविभागाची काही कार्यालयं असणाऱ्या इमारतीचा सध्या कायापालट केला जात असून जुन्या कार्यालयांचं घरात रुपांतर केलं जात आहे. कोरोनामुळे बाजाराची मागणी बदलली असून कार्यालयांपेक्षा घरांची मागणी वाढल्याचं चित्र आहे.
वर्क फ्रॉम होम
गेल्या दोन वर्षांपासून घरातून काम करणाऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे. अगोदर सक्ती म्हणून आणि त्यानंतर सोय म्हणून अनेक क्षेत्रांत वर्क फ्रॉम होम सुरू आहे. अनेक क्षेत्रं अशी आहेत ज्यांना या काळात वर्क फ्रॉम होमचा फायदा लक्षात आल्यामुळे त्यांनी अद्यापही त्याच प्रकारे काम सुरू ठेवलं आहे. परिणामी कार्यालयांची बाजारातील मागणी कमी होत चालली असून घरातच कार्यालयं असणं नागरिकांना अधिक गरजेचं वाटत आहे.
घरांना अधिक मागणी
न्यूयॉर्कमधील एका 14 मजली कार्यालयीन इमारतीचं अपार्टमेंटमध्ये रुपांतर करण्यात आलं आहे. कार्यालयं असताना ही इमारत पडून होती, मात्र त्याचं घरांमध्ये रुपांतर केल्यानंतर त्याचा खप वाढला आहे. रेंटकॅफे नावाच्या लिस्टिंग सर्व्हिसनं केलेल्या सर्व्हेनुसार गेल्या वर्षभरात 20,100 ऑफिसेसचं राहत्या घरात रुपांतर करण्यात आलं आहे. हे प्रमाण त्यापूर्वीच्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट आहे. याचाच अर्थ कार्यालयांचं स्वरूप बदलून त्याचं राहत्या घरांमध्ये, फ्लॅटमध्ये रुपांतरीत करण्याच्या प्रकल्पांना सध्या अमेरिकेत चलती असल्याचं चित्र आहे.
कोरोना इफेक्ट
हे वाचा-
राष्ट्रपतींच्या अवमानप्रकरणी पत्रकार तुरुंगात, 'हा' शब्द पडला महागात
बिल्डरचा हिशेब
रिकामी ऑफिसेस असण्यापेक्षा त्यांचं घरांमध्ये परिवर्तन कऱणं हे आर्थिकदृष्ट्या अधिक परवडणारं असल्याचं बिल्डरचं म्हणणं आहे. त्यामुळे सध्या अनेक बिल्डर हे जुनी कार्यालयं विकत घेऊन त्याची डागडुजी करत आहेत आणि त्याचं घरात रुपांतर करून बाजारात आणत असल्याचं दिसत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.