मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

हजारो लोकांना मेसेजवर पाठवले NUDE फोटो, जमवलेल्या 5 कोटीत पुण्याचं काम

हजारो लोकांना मेसेजवर पाठवले NUDE फोटो, जमवलेल्या 5 कोटीत पुण्याचं काम

50 कोटीहून अधिक प्राण्यांचा जीव घेतलेल्या आगीसाठी या मॉडेलनं हजारो लोकांना पाठवले न्यूड फोटो.

50 कोटीहून अधिक प्राण्यांचा जीव घेतलेल्या आगीसाठी या मॉडेलनं हजारो लोकांना पाठवले न्यूड फोटो.

50 कोटीहून अधिक प्राण्यांचा जीव घेतलेल्या आगीसाठी या मॉडेलनं हजारो लोकांना पाठवले न्यूड फोटो.

  • Published by:  Priyanka Gawde

लॉस एंजेल्स, 06 जानेवारी : गेल्या 4 महिन्यांपासून ऑस्ट्रेलियातील जंगलात भीषण आग लागली आहे. या आगीनं आतापर्यंत 50 कोटीहून अधिक प्राण्यांचा जीव घेतला आहे. त्यामुळं ऑस्ट्रेलियातील जीवन पुर्वपदावर येण्यासाठी जगभरातून मदत केली जात आहे. यात अमेरिकेतील एक तरुणीनं चक्क न्यूज फोटो लोकांना पाठवून 5 कोटी कमवल्याचे समोर आले आहे. 20 वर्षांच्या एका मुलानं ट्विटरवर दिलेल्या माहितीनुसार या मुलीनं ऑस्ट्रेलियातील परिस्थिती सुधारण्यासाठी ही मदत म्हणून केली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी ट्विटरवर या मुलानं, प्रत्येक न्यूड फोटोमागे 700 रुपये घेत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यानं दिलेल्या क्रमांकावर तब्बल 5 कोटी रुपये जमा झाले. न्यूड फोटोमुळं या तरुणीला जगभरातून विरोधही करण्यात आला. एवढेच नाही तर काही लोकांनी धमकीवजा मेसेजही तिला पाठवले.

वाचा-49 वर्षाच्या सुपर मॉडेलनं पुन्हा शेअर केला टॉपलेस फोटो, सोशल मीडियावर धिंगाणा

न्यूड फोटो पाठवून 5 कोटी जमा करणाऱ्या या 20 वर्षीय मुलीचे नाव आहे केलन वार्ड. न्यूड फोटोमुळे केलनचे इन्स्टाग्राम अकाउंटही बंद करण्यात आले होते. केलन अमेरिकेच्या लॉस एंजेलिसमध्ये राहते आणि त्यांनी ऑस्ट्रेलियामध्ये भीषण आगीत भस्म झालेल्यांना मदत करण्याचे आवाहन केले होते. मात्र न्यूड फोटोमुळे पैसे गोळा करण्याची तिची ही मोहीम बर्‍याच लोकांना आवडली नाही. त्यामुळं तिला जीवे मारण्याची आणि बलात्काराच्या धमक्याही देण्यात आल्या होत्या.

वाचा-बॉलिवूड सेलिब्रेटीवर SEX रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा आरोप

वाचा-या 6 अभिनेत्रींचे इंटिमेट सीन लीक झाल्यानं सोशल मीडियावर उडाली होती खळबळ!

केलनने आपल्या चाहत्यांना सोशल मीडियावर सांगितले होती की, ज्या कोणाला मदत करायची असेल त्यांनी किमान ऑस्ट्रेलियातील धर्मादाय संस्थेकडे किमान 700 रुपये पाठवावेत. यानंतर, निधी हस्तांतरणाची पावती देण्यात येईल. केलननं अपील केल्यानंतर काही वेळातच 20 हजार मेसेज तिला पाठवण्यात आले. याच जोरावर केलननं 5 कोटी रुपये जमवून दाखवले.

वाचा-मलंग सिनेमाचं हॉट पोस्टर रिलीज, दिशाने खांद्यावर बसून आदित्यला केलं लिपलॉक KISS

ऑस्ट्रेलियात भीषण आग

ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स स्टेटमध्ये पहिल्यांदा आग लागली. राजधानी मेलबर्न आणि सिडनी याच राज्यात समुद्र किनाऱ्यावर आहेत. इथं 70 लाख लोक राहतात. वेल्सनंतर आग विक्टोरियापर्यंत पोहचली. गेल्या आठवड्यात मल्लकूटातील जंगलाला आगा लागली. यामुळे शहरातील 4 हजार लोकांना स्थलांतर करावं लागलं. जवळपास 1.23 कोटी एकर क्षेत्र आगीत भस्मसाथ झालं आहे. सिडनीच्या ओपेरा हाऊसपेक्षाही आगीचे लोट उंच असल्याचं म्हटलं जात आहे. ही आग विझवण्यासाठी 74 हजार कर्मचारी काम करत आहेत. आगीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेतली जात आहे.

First published: