काबूल, 06 सप्टेंबर: अफगाणिस्तानमध्ये नॉर्दन रेझिस्टन्स फोर्स (NRF) (अहमद मसूदचा गट) आणि तालिबान (Taliban) यांच्यात पंजशीर येथे युद्ध (Panjshir war) धुमसत आहे. मागील बऱ्याच दिवसांपासून याठिकाणी मोठ्या प्रमाणात हिंसाचाराच्या बातम्या समोर येत आहेत. दोन्ही गटांकडून विविध दावे केले जात आहेत. यानंतर आता तालिबान्यांसमोर नॉर्दन आघाडी कमकुवत झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अशात नॉर्दन आघाडीचे प्रवक्ते फहीम दश्ती (NRF Speaker fahim Dashty death) तालिबानशी युद्धात मारले गेल्याची माहिती समोर आहेत. जेव्हापासून तालिबान पंजशीरवर ताबा मिळवण्यासाठी युद्ध लढत आहे. तेव्हापासून दश्ती NRF चा प्रवक्ता म्हणून नॉर्दन आघाडीची बाजू जगासमोर मांडत होते.
पण पंजशीर येथे झालेल्या एका चकमकीत फहीम फश्ती मारले गेले आहेत. फहीम दश्ती जवळपास 30 वर्षे एनआरएफसोबत काम करत होते. 2001 मध्ये, जेव्हा अल कायदा आणि तालिबाननं मिळून नॉर्दन आघाडीचे प्रमुख अहमद शाह मसूद यांची हत्या केली, तेव्हा फहीम दश्ती या हल्ल्यातून थोडक्यात बचावले होते. त्यानंतर आता बरोबर 20 वर्षांनंतर, फहीम दश्ती तालिबानशी झालेले युद्धात मारले गेले आहेत.
हेही वाचा- तालिबानसोबत शांततेनं तोडगा काढण्यासाठी पंजशीर तयार, चर्चेचा ठेवला प्रस्ताव
पंजशीरचा सर्वात निष्ठावंत नेता
फहीम दश्ती जेव्हा 7-8 वर्षांचे होते, तेव्हा ते एका लग्न समारंभात पहिल्यांदा नॉर्दन आघाडीचे प्रमुख अहमद शाह मसूदला भेटले होते. 1980 च्या दशकात अहमद शाह मसूद यांच्या नेतृत्वाखालील मुजाहिदीनचा सोव्हिएत युनियनशी संघर्ष झाला होता. याच घटनेपासून प्रेरित होऊन, दश्ती यांनी 1990 मध्ये नॉर्दन आघाडीत प्रवेश केला होता.
हेही वाचा-तालिबान्यांचं सुपर मार्केट पाहिलं का? US सैन्यांच्या बंदूकांचीही करताहेत विक्री
9 सप्टेंबर 2001 रोजी अल कायदाचे काही दहशतवादी पत्रकार बनून अहमद शाह मसूद यांच्या भेटीला आले होते. दरम्यान त्यांनी मसूद यांची रुममध्ये मोठा विस्फोट घडवून आणला होता. या हल्ल्यात फहीम गंभीररित्या भाजले होते. पण त्यांचा प्राण वाचला होता. अमेरिकेच्या 9/11 हल्ल्याच्या दोन दिवस आधी अहमद शाह मसूदची हत्या झाली होती. फहीम दश्ती हे एक पत्रकार होते. एक तरुण पत्रकार म्हणून त्यांना नॉर्दन आघाडीच्या घडामोडीबाबत रिपोर्टींग करण्याचं काम देण्यात आलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.