S M L

आता पुरुषांसाठीही गर्भनिरोधक गोळ्या!

ही गोळी पूर्णपणे सुरक्षित आणि परिणामकारक असल्याचं वैज्ञानिकांचं म्हणणं आहे. ही गोळी महिलांकरिता असलेल्या गर्भनिरोधक गोळीप्रमाणेच आहे.

Sonali Deshpande | Updated On: Mar 22, 2018 02:58 PM IST

आता पुरुषांसाठीही गर्भनिरोधक गोळ्या!

22 मार्च : गर्भनिरोधकाच्या क्षेत्रात क्रांतिकारक म्हणावी अशी घटना घडली आहे. वैज्ञानिकांनी पुरुषांसाठी गर्भनिरोधक गोळी विकसित केली आहे. ही गोळी पूर्णपणे सुरक्षित आणि परिणामकारक असल्याचं वैज्ञानिकांचं म्हणणं आहे. ही गोळी महिलांकरिता असलेल्या गर्भनिरोधक गोळीप्रमाणेच आहे.

प्रायोगिक तत्त्वावर, खास पुरुषांसाठी तयार करण्यात आलेल्या या तोंडावाटे खाण्याच्या गर्भनिरोधक गोळीचं नाव डिमेथॅन ड्रोलोन अनडिकॅनोट (DMAU) असं आहे. वॉशिंग्टन विद्यापीठाचे प्राध्यापक स्टिफनी पेज यांनी हे संशोधन केलं आहे.

शिकागो येथे झालेल्या एंडोक्राइन सोसायटीच्या वार्षिक सभेत प्रा. पेज यांनी हे संशोधन मांडलं. १८ ते ५० वर्षे वयोगटातल्या पुरुषांवर या गोळीचा प्रयोग करण्यात आला. महिलांप्रमाणेच पुरुषांनाही दररोज ही गोळी घ्यावी लागते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 22, 2018 02:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close