Home /News /videsh /

फक्त सर्दी, ताप खोकलाच नाही तर शास्त्रज्ञांना कोरोनाची सापडली आणखी 6 लक्षणं

फक्त सर्दी, ताप खोकलाच नाही तर शास्त्रज्ञांना कोरोनाची सापडली आणखी 6 लक्षणं

जगाची रुग्ण बरे होण्याची सरासरी 61.20 टक्के एवढी आहे. त्या सरासरीपेक्षा भारताचं प्रमाण जास्त आहे.

जगाची रुग्ण बरे होण्याची सरासरी 61.20 टक्के एवढी आहे. त्या सरासरीपेक्षा भारताचं प्रमाण जास्त आहे.

काही रुग्णांमध्ये 2 ते 14 दिवसांमध्ये लक्षणे दिसून येतात. या लक्षणांचा आणखी आणि व्यापक अभ्यास होण्याची गरज आहे.

    न्यूयॉर्क 27 एप्रिल: जगभर कोरोनाचा प्रकोप वाढतोच आहे. बाधितांची संख्याही वाढत आहे. जगभरातले शास्त्रज्ञ कोरोनावर संशोधन करत आहेत. पुढच्या काही महिन्यांमध्ये त्यावर लस येण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. आत्तापर्यंत सर्दी, ताप, खोकला, कफ, घश्यात खवखवणं, श्वास घ्यायला अडचण ही कोरोनाची लक्षणं ओळखली जात होती. मात्र अमेरिकेच्या Centers for Disease Control and Prevention म्हणजेच CDC या सरकारी रिसर्च संस्थेने COVID19 ची नवी 6 नवी लक्षणे सांगितली आहेत. CDCमध्ये जगभरातल्या कोरोना रुग्णांचा आणि तिथल्या परिस्थितीचा अभ्यास करण्यात येत आहे. त्या अभ्यासातून शास्त्रज्ञांना ही नवी लक्षणे आढळून आली आहेत. त्यात जास्त थंडी वाजणं, थंडी वाजून हातपाय थरथरणे, सांधे दुखणे, वारंवार डोकं दुखणं, घश्यामध्ये खवखव आणि दुखणे, वास न येणं या लक्षणांचाही समावेश आहे. काही रुग्णांमध्ये 2 ते 14 दिवसांमध्ये लक्षणे दिसून येतात तर काही रुग्णांमध्ये हलक्या स्वरुपाची, काहींमध्ये मध्यम तर काहींमध्ये तीव्र स्वरुपाची लक्षणे दिसून येतात त्यामुळे या लक्षणांचा आणखी आणि व्यापक अभ्यास होण्याची गरज असल्याचं मतही या संस्थेने व्यक्त केलं आहे. भारतात तर या संदर्भात आणखी वेगळी माहिती बाहेर आलीय. महाराष्ट्रातल्या जवळपास 80 टक्के रुग्णांमध्ये लक्षणेच दिसून आली नाहीत. त्यामुळे टेस्टिंग झाल्यावरच त्यांना कोरोना असल्याचं कळलं होतं. त्यामुळे जास्तित जास्त टेस्टिंग करण्याचा सल्लाही या संस्थेने सगळ्या देशांना दिला. सगळं जग Lockdownमध्ये असताना चीनमध्ये सुरू झाले शाळा आणि कॉलेजेस दरम्यान, चीनच्या वुहानपासून कोरोना पसरण्यास सुरुवात झाली, हे सत्य सर्वांना ठावूक आहे. दरम्यान हा व्हायरस पसरला की पसरवला गेला, याबाबत अजूनही वाद आहेत. मात्र या सगळ्यात ज्या वुहानमधून कोरोनानं जगात थैमान घातले, ते शहर आता कोरोनामुक्त झाले आहे. दरम्यान चीनमधील ज्येष्ठ आरोग्य अधिकारी आणि वैज्ञानिकांनी, देशात पुन्हा कोरोनाचे संक्रमण होऊ शकते, असा इशारा चीनला दिला आहे. एकीकडे कोरोनाचे केंद्र मानल्या जाणार्‍या वुहानमध्ये शेवटच्या रुग्णालाही डिस्चार्ज देण्यात आला आहे. असे असताना, चिनी शास्त्रज्ञांनी कोरोना परत येण्याची शक्यता वर्तवली आहे. या शास्त्रज्ञांनी, विदेशातून एकजरी रुग्ण चीनमध्ये आला तर कोरोना नक्की पसरेल. कॅन्सरचं काय कोरोनासमोरही मानली नाही हार; 4 वर्षांच्या चिमुरडीचा लढा यशस्वी राष्ट्रीय आरोग्य आयोगाने (NHC) रविवारी सांगितले की, चीनमध्ये सध्या परदेशातील संक्रमित लोकांची संख्या 1 हजार 634 आहे आणि त्यातील 22 जणांची प्रकृती गंभीर आहे. परदेशातून संक्रमित लोकांच्या प्रकरणांमुळे पुन्हा कोरोना होण्यापासून रोखणे हे चीनपुढील मोठे आव्हान आहे, असे मत कमिशनचे प्रवक्ते आणि विषाणू शास्त्रज्ञ मेई फेंग यांनी व्यक्त केले आहे. फेंग म्हणाले की, हा साथीचा रोग पुन्हा वाढू नये यासाठी पावले उचलणे आवश्यक आहे आणि खबरदारी देखील घेतली पाहिजे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या