S M L

आशिया खंडात ऐतिहासिक क्षण, सीमेवर भेटले दोन्ही कोरियाचे नेते!

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जाँग उन आणि दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जे-ईन यांची सीमेवर भेट झाली आहे.

Renuka Dhaybar | Updated On: Apr 27, 2018 09:10 AM IST

आशिया खंडात ऐतिहासिक क्षण, सीमेवर भेटले दोन्ही कोरियाचे नेते!

27 एप्रिल : उत्तर आणि दक्षिण कोरियाच्या इतिहासात एक ऐतिहासिक क्षण आला आहे. दोन्ही कोरियाचे नेते एकमेकांना भेटले आहेत. उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जाँग उन आणि दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जे-ईन यांची सीमेवर भेट झाली आहे.

तसंतर, दोन्ही नेते नो मॅन्स लँडवर भेटले, पण मैत्रीचं प्रतीक म्हणून एकमेकांनी शत्रूराष्ट्राच्या भूमीत पाऊल देखील टाकलं. दरम्यान, दोघांमध्ये उत्तर कोरियाच्या अणुशस्त्रांस्त्रांबाबत चर्चा होणार आहे. १९५३ पासून अशी भेट झालीच नव्हती. त्यामुळे तब्बल ६५ वर्षांनी दोन्ही कोरियाचे नेते एकमेकांना भेटले आहेत.

आज या दोन देशांच्या प्रमुख नेत्यांमध्ये एक ऐतिहासिक संवाद होणार आहे, ज्यामध्ये उत्तर कोरियाचे परमाणु कार्यक्रम थांबवण्यासाठी दिलेल्या इशाऱ्यावरही चर्चा करण्यात येणार आहे.

किम जाँग उन यांनी शुक्रवारी कोरियाच्या सम्मेलनात भाग घेण्यासाठी पायी चालत सीमा पर केली. दक्षिण कोरियाच्या अध्यक्षांनी त्यांचे स्वागत केले आणि तुम्हाला भेटून आनंद झाला असंही म्हणाले.

Loading...
Loading...

कोरिया इन्स्टिट्यूट ऑफ डिफेन्स अॅनालिसिसच्या सांगण्यानुसार, दोन्ही नेत्यांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी एकमेकांशी संवाद साधला आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 27, 2018 09:09 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close