सिओल, 26 जुलै : जगभरात एक कोटींहून अधिक कोरोनोबाधित रुग्णांची संख्या झाली आहे. हा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा प्रसार चीनच्या वुहान शहरातून झाल्याचे पुरावे काही देशांना सापडले आहेत, त्यानुसार नोव्हेंबरमध्ये वुहान शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. मात्र या सगळ्यात जगाच्या पाठीवर असेही देश होते, जेथे कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नव्हता. मात्र उत्तर कोरियात मात्र कोरोनाचा पहिला रुग्ण (First Covid-19 Case in N. Korea) तब्बल 8 महिन्यांनी सापडला आहे. पहिला रुग्ण सापडताच किम जोंग (kim Jong Un) प्रशासनाने सीमेवरील केसनॉंगमध्ये (Kaesong) लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.
असे सांगितले जात आहे की, कोरोनाबाधित रुग्ण तीन वर्षांपूर्वी दक्षिण कोरियाला गेला होता, आता तो बेकायदेशीरपणे उत्तर कोरियात परतला आहे. या व्यक्तीस अधिकृतपणे कोरोना रुग्ण घोषित करण्यात आला आहे, त्यामुळे हा उत्तर कोरियातील पहिला कोरोना रुग्ण असेल.
वाचा-कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी चीनचा खास डायट! तुम्ही करा आहारात सामील
#UPDATE North Korean authorities impose a lockdown on the border city of Kaesong after discovering their first 'suspected' COVID19 case: AFP news agency https://t.co/J0hhMeoJ98
— ANI (@ANI) July 26, 2020
वाचा-तरुणांमध्ये दीर्घकाळही राहू शकतो COVID-19 आजार, अमेरिकन डॉक्टरांचा रिपोर्ट
आतापर्यंत एकही कोरोनाबाधित रुग्ण नव्हता
उत्तर कोरिया सातत्याने सर्व देशांना, आमच्या देशात एकही कोरोना रुग्ण नाही असे ठणकावून सांगत होता. मात्र उत्तर कोरियाच्या या दाव्यावर तज्ज्ञांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सीने सांगितले की, काही वर्षापूर्वी दक्षिण कोरियामध्ये पळून गेलेल्या आणि गेल्या आठवड्यात बेकायदेशीरपणे उत्तर कोरियाच्या सीमेमध्ये घुसलेल्या या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. केसीएनएच्या मते, श्वसन आणि रक्त तपासणीतून असे दिसून आले की त्या व्यक्तीला विषाणूद्वारे "संसर्ग झाल्याचा संशय आहे". या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांना देखील क्वारंटाइन करण्यात आले आहे. दरम्यान, उत्तर कोरियाने कोरोनामुक्त देशासाठी सर्व सीमा बंद केल्या होत्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Kim jong un