मराठी बातम्या /बातम्या /विदेश /तब्बल वर्षभरानंतर समोर आली किम जोंगची पत्नी; कोरोना काळात काय करीत होती?

तब्बल वर्षभरानंतर समोर आली किम जोंगची पत्नी; कोरोना काळात काय करीत होती?

कोरोनाव्हायरस संसर्ग झाल्यामुळे किंवा तिचं काही बरं-वाईट झाल्याची शक्यता व्यक्त केली जात होती.

कोरोनाव्हायरस संसर्ग झाल्यामुळे किंवा तिचं काही बरं-वाईट झाल्याची शक्यता व्यक्त केली जात होती.

कोरोनाव्हायरस संसर्ग झाल्यामुळे किंवा तिचं काही बरं-वाईट झाल्याची शक्यता व्यक्त केली जात होती.

उत्तर कोरिया, 18 फेब्रुवारी : उत्तर कोरियाचे हुकूमशाहा किम जोंग ऊन ( Kim Jong-un) यांची पत्नी तब्बल एका वर्षानंतर जगासमोर आली आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमातून किम यांच्या पत्नीविषयी चर्चांना उधाण आलं होतं. किम जोंग यांची पत्नी री सोल जू (Ri Sol-Ju) उत्तर कोरियाचे पूर्व हुकूमशाहा किम जोंग-2 यांच्या वाढदिवसाला आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात उपस्थित होती. गेल्या एक वर्षांपासून ती गायब होती. यामुळे काही जणांनी ती प्रेग्नेंट असल्याचं म्हटलं होतं तर अनेकांनी री सोलच्या तब्येतीचं बरंवाईट झाल्याची भीती वर्तवली होती. मागील वर्षी 25 जानेवारीला ती नववर्षाच्या स्वागत समारंभात दिसून आली होती.

असं मानलं जात आहे की, 32 वर्षीय री सोल जू ला(Ri Sol-Ju) कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं होतं. ती कुठेही फारशी जात येत नव्हती. कोरोना व्हायरसचं संक्रमण झाल्यानं तिच्यावर उपचार सुरु होते अशीही माहिती समोर येत होती. याचबरोबर ती प्रेग्नेंट असल्याचं देखील म्हटलं जात होतं. झी न्यूजच्या वृत्तानुसार,कोरिया इन्स्टिट्युट फॉर नॅशनल युनिफिकेशनच्या उत्तर कोरियासंबंधी संशोधन विभागाचे संचालक हाँग मीन यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना संक्रमण झाल्यानं तिला अज्ञातवासात ठेवण्यात आलं होतं. लहान मुलांची आई असल्यानं ती सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये जात नव्हती. महत्त्वाचं म्हणजे किम जोंग ऊन यांनीदेखील मागील काही काळापासून सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभाग दर्शविलेला नाही.

अवश्य वाचा -    'या' गोड चिमुकलीच्या फोटोत दडलंय काही तरी वेगळंच; वाचून व्हाल थक्क

 ब्रिटनच्या मिररमध्ये आलेल्या वृत्तानुसार, कोरियाच्या इंटेलिजन्स ब्युरोने दिलेल्या माहितीनुसार ती सुरक्षित असून तिच्या मुलांबरोबर वेळ घालवत असल्याचं म्हटलं होतं. याचबरोबर आणखी देखील एक कारण समोर येत होतं कि, किम जोंग-उनची मावशी किम क्युंग हिच्या आजारपणात ती तिच्याकडं लक्ष देत असल्याचं म्हटलं जात होतं. याचबरोबर री ही कोणत्यातरी गंभीर आजाराने ग्रस्त असल्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत होती. याचबरोबर तिच्या पतीनं म्हणजेच किम जोंग-उन याने तिचं काही बरंवाईट केल्याची देखील शंका उपस्थित होत होती.

दरम्यान,  किम जोंग-उन याच्याशी री हिचा 2009 मध्ये विवाह झाला होता. माजी गायिका असणारी त्याची पत्नी 2012 मध्ये जगासमोर आली होती. पतीची बहीण आणि जवळचे सल्लागार किम यो जोंग यांच्यासमवेत री एक गंभीर आणि अत्यंत उच्च-स्तरीय महिला म्हणून ओळखले जाते.

First published:
top videos

    Tags: Coronavirus, Kim jong un, North korea