कोरोनाच्या संकटात किम जोंग रचत आहेत खतरनाक प्लॅन, बैठक घेऊन जगाला दिला इशारा

कोरोनाच्या संकटात किम जोंग रचत आहेत खतरनाक प्लॅन, बैठक घेऊन जगाला दिला इशारा

जर ही बैठक घेण्यात आली असेल तर किम जोंग बेपत्ता झाल्यानंतर घेतलेली ही पहिली बैठक असेल. एप्रिल महिन्यात किम जोंग यांच्या प्रकृतीबाबत अनेक अफवा आल्या होत्या.

  • Share this:

प्योंगयांग, 24 मे : एकीकडे संपूर्ण जग कोरोनासारख्या जैविक संकटाशी दोन हात करत आहेत तर दुसरीकडे उत्तर कोरिया मात्र आपली आण्विक क्षमता वाढवण्याच्या विचारात आहे. यासंदर्भात नुकतेच उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी अणु क्षमता वाढविण्यासाठी लष्कराची बैठक घेतली आहे. उत्तर कोरियाच्या एजन्सी केसीएनए यांनी रविवारी याबाबत माहिती दिली आहे.

या वृत्तामध्ये अशी माहिती देण्यात आली आहे की, उत्तर कोरिया सध्या आपली आण्विक क्षमता वाढवण्याची तयारी करत आहे. दरम्यान अद्याप याबाबत अधिकृत माहिती मिळाली नसली तरी, याबाबत किम जोंग यांनी सैन्यासोबत बैठक घेतल्याचं निश्चित आहे. किम जोंग यांनी घेतलेल्या या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेत, काही देशांवरही चर्चा केली. यामध्ये कोरिअन पीपल्स आर्मीच्या तुकड्या वाढवण्यासंदर्भातही चर्चा करण्यात आली.

वाचा-किम जोंग जिवंत असल्याचा आणखी एक पुरावा, चीनला पाठवला मेसेज म्हणाले.

उत्तर कोरियानं सेनेला केलं अलर्ट

केसीएनएनं आपल्या रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, उत्तर कोरियानं आण्विक युद्धात स्वत:चा बचाव करण्यासाठी हा प्लॅन तयार करत आहेत. याबाबतच बैठकीत निर्णय घेण्यात आला. केंद्रीय सैन्य आयोगाच्या बैठकीत कोणत्याही कारवाईसाठी सैन्य दलांना उच्च सतर्कतेवर ठेवण्याचीही चर्चा होती. देशाच्या सैन्याच्या विकासाची प्रक्रिया देखील सातत्याने सुरू राहील. या बैठकीच्या तारखेविषयी कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

वाचा-किम जोंग वापरतायत बॉडी डबल? जुन्या आणि नव्या व्हायरल PHOTO मध्ये आहेत 'हे' फरक

बेपत्ता झाल्यानंतर पहिली बैठक

दरम्यान जर ही बैठक घेण्यात आली असेल तर किम जोंग बेपत्ता झाल्यानंतर घेतलेली ही पहिली बैठक असेल. एप्रिल महिन्यात किम जोंग यांच्या प्रकृतीबाबत अनेक अफवा आल्या होत्या. किम जोंग यांच्या मृत्यूबाबतच्या बातम्या आल्यानंतर किम यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. ज्यामध्ये किम स्वत: उद्घाटन करताना दिसत आहेत. दरम्यान, वॉशिंग्टन पोस्टने शुक्रवारी अमेरिकेत ट्रम्प प्रशासनाच्या बैठकीची माहिती दिली. यावेळी उत्तर कोरियाच्या आण्विक युद्धाबाबत माहिती दिली. असे सांगितले जात आहे की 1992 नंतर या बैठकीत अमेरिकेने अणु चाचणीवर चर्चा केली. हे रशिया आणि चीनच्या धोक्याबद्दल बोलले जात आहे.

वाचा-किम जोंग यांच्या प्रकृतीबाबत संशय कायम? 'तो' VIDEO खोटा असल्याची माहिती लीक

First published: May 24, 2020, 11:26 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading