मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

Corruption | उत्तर कोरियात भ्रष्टाचार का फोफावला? सरकारच याला प्रोत्साहन देतंय का?

Corruption | उत्तर कोरियात भ्रष्टाचार का फोफावला? सरकारच याला प्रोत्साहन देतंय का?

उत्तर कोरियामध्ये (North Korea) भ्रष्टाचार (Corruption) खूप जास्त आहे. मागील 20 वर्षांपासून सातत्याने ते शेवटच्या क्रमांकावर आहे. या देशात भ्रष्टाचार वेगळ्या स्वरूपात आणि वेगळ्या विचारसरणीप्रमाणे विकसित झाला आहे. भ्रष्टाचार हा उच्च स्तरावर तर आहेच. पण, तो खालच्या स्तरावर आणि सामान्य लोकांसाठी एक चांगली सुविधा म्हणून विकसित झाला आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Rahul Punde

मुंबई, 23 नोव्हेंबर: हुकूमशाहीसारख्या कठोर राजवटीत भ्रष्टाचार (Corruption) कमी होत असेल, असं सर्वसाधारणपणे आपल्याला वाटत असेल. पण, दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं. हे सर्व व्यवस्थेच्या ताकदीवर अवलंबून असते. भ्रष्टाचाराची परिस्थिती जगासमोर किती येते, यावर देखील बरेच काही अवलंबून आहे. नुकत्याच झालेल्या वार्षिक करप्शन परसेप्शन इंडेक्समध्ये (Corruption Perceptions Index) गेल्या दोन दशकांपासून सर्वात तळाशी असलेला उत्तर कोरिया यावेळीही शेवटच्या स्थानावर आहे. भ्रष्टाचाराच्या बाबतीत उत्तर कोरिया हे खरेच मोठे उदाहरण आहे का? या प्रचंड भ्रष्टाचारामागील कथा काय आहे?

इथेही भ्रष्टाचार

अनेक देशांच्या सरकारांमध्ये भ्रष्टाचाराची मोठी शक्यता असते. लाच ही अनुदान प्रणालीचा एक प्रमुख भाग असून अशा उच्च स्तरावर याची देवाण-घेवाण होण्याची शक्यता जास्त असते. पण उत्तर कोरियातील भेटवस्तूंच्या राजकारणाने उद्योगांना वेगळी दिशा दिली आहे. इथेही भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर पसरला आहे, पण इथे खालच्या पातळीवर त्याचा चांगलाच परिणाम होतो.

भ्रष्टाचार करणे सोयीचे

उत्तर कोरियात खासगी क्षेत्राची ताकद वाढत आहे, त्यामुळे येथील लोकांची विचारसरणीही बदलत आहे. सार्वजनिक सुरक्षा मंत्रालयाच्या नजरेत न येता लाच देणे सर्वसामान्यांसाठी सोपं किंवा सोयीचं झालं आहे. नॉर्थ ईस्ट एशिया पीस अँड करप्शन इन्स्टिट्यूटनुसार, सुमारे 90 टक्के उत्तर कोरियाचे लोक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे बाजारातील भ्रष्टाचाराशी संबंधित आहेत.

अधिकाऱ्यांना गलेलठ्ठ पगार?

हे उत्तर कोरियाबाहेरील परिस्थितीवरून समजू शकते. उत्तर कोरिया सरकार आपल्या अधिकार्‍यांना खूप जास्त पगार देईल जेणेकरून तिथल्या लाचखोरीला आळा बसेल. मात्र, याच्या प्रभावाची हमी दिली जात नाही. कडेकोट व्यवस्थेमुळे भ्रष्टाचाराला आळा घालण्यात सिंगापूरला यश आले आहे, तर केनिया आपल्या खासदारांना भरघोस पगार देऊनही निर्देशांकाच्या खूपच खाली आहे.

'भ्रष्टाचारमुक्त भारत बनवण्यात मोदी सरकार अपयशी', उपोषणादरम्यान ...

तोट्यातही एक फायदा

उत्तर कोरियात अधिकाऱ्यांना खूप कमी वेतन दिले जाते. सहसा, संबंधित अधिकार्‍यांवर परकीय चलन मिळविण्याचा दबाव असतो, ज्यायोगे लाचखोरी आणि प्रलोभन हे व्यवस्थेचा एक आवश्यक भाग बनतात. मोठ्या प्रमाणावर, हे कोणत्याही देशासाठी अत्यंत चुकीचे, अकार्यक्षम आणि शेवटी अत्यंत हानिकारक असल्याचे सिद्ध होते. मात्र, तरीही हे उत्तर कोरियाच्या समाजात एकसंधता आणत आहे.

सामाजिक बदल

येथील लाचखोरीमुळे येथील हुकूमशाही व्यवस्थेचा थेट भाग असलेल्या अनेक गरीब लोकांचे जीवनमान उंचावत आहे. हे अचानक घडले नाही. 1990 मध्ये सरकारी यंत्रणा अपयशी ठरल्यानंतर, गुंतवणूकदार, कामगार आणि तज्ञांसाठी खाजगी बाजारपेठा देशात वेगाने विकसित झाल्या आणि दैनंदिन जीवनात लाचखोरी वाढल्यामुळे लोकांमध्ये नवीन सामाजिक बदल दिसून आले.

भ्रष्टाचारानेच काम होते

नवीन माहितीसाठी लोकांनी प्रतिबंधित रेडिओ प्रसारण ऐकण्यास सुरुवात केली आहे. लोक बंदी घातलेल्या वस्तू वापरतात आणि पकडले तर लाच देऊन सुटतात. सार्वजनिक वितरण व्यवस्थेशिवाय लोकांना सत्तेचा अत्यल्प लाभ मिळतो. मात्र, अधिकारी आणि एजंटकडून या मार्गाने आपली कामे करून घेता येतात, हे येथील भ्रष्टाचाराचे महत्त्व लोकांना समजले आहे.

पैसे घेताना पकडताच पोलीस अधिकाऱ्याचा ACBकर्मचाऱ्यावर गोळीबार ...

फायदेशीर आर्थिक संधींसाठी सरकारी यंत्रणेशी औपचारिकरीत्या संबंध नसलेल्यांसाठी लाचखोरी अत्यंत महत्त्वाची आहे. परकीय चलन कमावणार्‍या कंपन्या त्यांचे व्यवसाय परवाने उच्च वर्गीय गुंतवणूकदारांना लाच म्हणून विकतात. या वरच्या वर्गाला डोंजू म्हणतात. असा पैसा अप्रत्यक्षपणे सरकारी तिजोरीतच जातो. सरकारलाच परकीय चलनाच्या तुटवड्याचा सामना करावा लागत असल्याने ते स्वतःच आपली पकड सैल करण्याच्या तयारीत आहेत.

First published: