Kim Jong Un: सस्पेन्स संपला! किम जोंग यांच्या नव्या फोटोनं दिली प्रकृतीबाबत माहिती

Kim Jong Un: सस्पेन्स संपला! किम जोंग यांच्या नव्या फोटोनं दिली प्रकृतीबाबत माहिती

दोन दिवसांपूर्वी दक्षिण कोरियाचे माजी अध्यक्ष किम डे-जंगचे अधिकारी असलेले चांग सॉंग-मीन यांनी किम जोंग-उन कोमामध्ये असल्याचा दावा केला होता.

  • Share this:

सियोल, 26 ऑगस्ट : उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. दोन दिवसांपूर्वी दक्षिण कोरियाचे माजी अध्यक्ष किम डे-जंगचे अधिकारी असलेले चांग सॉंग-मीन यांनी किम जोंग-उन कोमामध्ये असल्याचा दावा केला होता. या दाव्यानंतर खळबळ उडाली होती. मात्र हा दावाही खोटा ठरवत किंम जोंग यांच्या नुकत्याच झालेल्या एका बैठकीताचा फोटो सध्या व्हायरल होत आहे. किंम जोंग यांनी आपल्या पक्षातील सदस्यांसोबत एक बैठक करताना दिसून आले. उत्तर कोरियाच्या अधिकृत एजन्सिनं हे फोटो जारी केले आहेत. या फोटोंमध्ये किम निरोगी दिसत आहेत.

कोरियन सेंट्रल न्यूज या वृत्तसंस्थेनं जारी केलेल्या या फोटोमध्या किम यांची प्रकृती चांगली दिसत आहे. किम यांनी यावेळी वर्कर्स पार्टीच्या काही सदस्यांसोबत बैठक घेतली. यावेळी त्यांनी कोरोनाव्हायरस आणि उत्तरा कोरियाच्या दिशेने येणाऱ्या वादळाबाबत चर्चा केली. मात्र सध्या व्हायरल होत असलेला किम यांचा हा फोटो नवा आहे की जूना याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही आहे.

वाचा-समर्थक म्हणाली, ट्रम्प यांची बुद्धी 'उल्लू' प्रमाणे, Social Media वर Video Viral

किम यांनी केली कोरोना आणि वादळावर चर्चा

याआधीही किम यांच्या प्रकृतीबाबत अफवा उठल्या होत्या. त्यावेळी किम यांनी सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहून सर्वांना पुरावा दिला होता. मात्र त्यावेळी जारी करण्यात आलेले फोटो खोटे असल्याचे दक्षिण कोरियाचे चांग सॉंग-मीन यांनी सांगितले होते. मात्र आता किम यांचे नवे फोटो समोर आले आहेत. यात किम सदस्यांसोबत बैठक करताना दिसत आहे. उत्तर कोरियाचे अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. कोरोना आणि आता वादळाचे संकट देशावर आहे. त्यामुळे किम सध्या देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यावर अधिक भर देत आहेत.

वाचा-भारताविरोधात पाकिस्तानची ताकद वाढवतोय चीन; आता उचललं हे पाऊल

वाचा-पृथ्वीच्या दिशेनं येत आहे आणखी एक संकट! 'या' तारखेला होणार Asteroid अटॅक

किम यांनी बहिणीला महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या दिल्याचे होते वृत्त

किम जोंग यांनी आपल्या तब्येतीमुळे त्यांची धाकटी बहीण किम यो जोंग यांच्याकडे महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या दिल्या असल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी समोर आले होते. याआधी किम यो जोंग यांचा देशासाठी मोठे निर्णय घेणाऱ्या अभिजात गटात समावेश करण्यात आला आहे. हा गट उत्तर कोरिया देशातील सर्व महत्त्वाचे निर्णय घेतात. किम योच्या प्रवेशानंतर असे मानले जाते की किम जोंग उननंतर ती आता सर्वात ताकदवान नेता बनली आहे. किम यो जोंग हे किम जोंग यांचे राजकीय सल्लागारही मानले जातात.

Published by: Priyanka Gawde
First published: August 26, 2020, 9:29 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading