मराठी बातम्या /बातम्या /विदेश /किम जोंग जिवंत असल्याचा आणखी एक पुरावा, चीनला पाठवला मेसेज म्हणाले...

किम जोंग जिवंत असल्याचा आणखी एक पुरावा, चीनला पाठवला मेसेज म्हणाले...

किम जोंग गेले 20 दिवसांपासून गायब असल्याचे आणि त्यांच्या मृत्यूच्या बातम्या आल्यानंतर किम जोंग जगासमोर आले.

किम जोंग गेले 20 दिवसांपासून गायब असल्याचे आणि त्यांच्या मृत्यूच्या बातम्या आल्यानंतर किम जोंग जगासमोर आले.

किम जोंग गेले 20 दिवसांपासून गायब असल्याचे आणि त्यांच्या मृत्यूच्या बातम्या आल्यानंतर किम जोंग जगासमोर आले.

प्योंगयांग, 08 मे : उत्तर कोरियाचे (North Korea) हुकूमशहा किम जोंग उन (Kim Jong-Un) तब्बल 20 दिवसांनी जनतेसमोर आले. आता किम यांनी कामकाजालाही सुरुवात केल्याच्या बातम्या येत आहेत. देशातील जनतेशी अधिकृत माध्यमांद्वारे पत्र दिल्यानंतर किम यांनी आता चिनी राष्ट्रपती शी जिनपिंग (Xi Jinping) यांना निरोप पाठविला आहे. योनहॅप न्यूज एजन्सीच्या म्हणण्यानुसार किम जोंग यांनी जिनपिंग यांना एक संदेश पाठवला आहे. यात त्यांनी जिनपिंग यांचे कोरोनाव्हायरसविरूद्ध लढ्यात यश मिळविल्याबद्दल अभिनंदन केले. दरम्यान हा मेसेज कोणत्या माध्यमाद्वारे पाठवण्यात आला, याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम यांनी कोरोनावर पहिल्यांदाच मत व्यक्त केले आहे. याआधी किम यांच्या सुरक्षा रक्षकाला कोरोना झाल्यामुळं त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आल्याच्या बातम्या होत्या. मात्र आता किम यांनी चीनचे कौतुक करत कोरोनावर मात केल्याबद्दल अभिनंदन केले आहे.

लॉकडाऊनमध्ये मीमकरांची क्रिएटीव्हिटी! 'वर्क फ्रॉम होम'वर बनले शेकडो मीम्स

योनहॅप न्यूजनं दिलेल्या वृत्तानुसार, या संदेशात किम जोंग यांनी जिनपिंग यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत म्हटले की चीननं गंभीर अशा कोरोना आजारावर विजय मिळवला. त्याचबरोबर त्यांनी राष्ट्रपतींच्या आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. किम म्हणाले की, चीनचा पक्ष आणि लोक हे यश कायम राखतील आणि जिनपिंग यांच्या मार्गदर्शनाखाली विजयी होतील.

जिवंत असल्याचा आणखी एक पुरावा

तज्ज्ञांच्या मते किम जोंग उनने या संदेशाद्वारे चीनशी असलेले त्यांचे संबंध आणि आपल्याआरोग्याविषयीचे पुरावे दिले आहेत. उत्तर कोरियाने स्वत: ला कोरोनामुक्त देश जाहीर केला आहे आणि चीनही आता कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर आहे. असे असले तरी, दोन्ही देशांमध्ये क्वारंटाइनचे नियम लागू करण्यात आले आहेत. अलग ठेवण्याचे नियम दोन्ही देशांमधील प्रवाशांनाही लागू आहेत.

किम जोंग यांच्याबाबत संशय कायम

किम जोंग गेले 20 दिवसांपासून गायब असल्याचे आणि त्यांच्या मृत्यूच्या बातम्या आल्यानंतर किम जोंग जगासमोर आले. मात्र ते किम जोंग नसून त्यांच्यासारखी दिसणारी ती व्यक्ती होती, असे समोर आले आहे. उत्तर कोरियाच्या माध्यमांनी 1 मेरोजी किम जोंग खताच्या कारखान्याचं उद्घाटन करतानाचा व्हिडीओ प्रसारित केला होता. कारखान्याची पाहाणी करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये किम यांची प्रकृती व्यवस्थित दिसत आहे.

हा खरा किम नाही, माजी खासदारांचा दावा

ब्रिटनचे माजी खासदार लुइस मेन्श यांनीही असा दावा केला आहे, व्हिडीओमध्ये दिसणारे किम नाही आहेत. फोटोमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीच्या दांत आणि चेहऱ्यांमध्ये फरक आहे. माजी खासदार लुइस मेन्श यांनी लिहिले आहे की ही एकसारखी व्यक्ती नाही. पण मी यावर वाद घालू शकत नाही. माझी माहिती बरोबर नाही हे शक्य नाही. हे चुकीचे असू शकत नाही. असे म्हटले जात आहे की काही लोक किम यांचे जुने फोटो वापरून व्हायरल करत आहेत. आता वय आणि आहारामुळे किम यांचा चेहरा बदलला आहे.

3 भारतीय फोटो जर्नालिस्टनी या काश्मीरच्या फोटोंसाठी जिंकला पुलित्झर पुरस्कार

First published:

Tags: Kim jong un