Home /News /videsh /

भयंकर! हुकुमशाहची दहशत सुरुच, कोरोनाचे नियम मोडणाऱ्याला Kim Jong Un ने घातली गोळी

भयंकर! हुकुमशाहची दहशत सुरुच, कोरोनाचे नियम मोडणाऱ्याला Kim Jong Un ने घातली गोळी

कोरोनाच्या भीतीने किमने आपल्या सर्व सीमा मार्च महिन्यापासून अधिकृतपणे बंद केल्या आहेत. अवैधपणे कुठेही जाणाऱ्या-येणाऱ्या लोकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी, त्या व्यक्तीला थेट गोळ्या घालण्याचं पाऊल उचलण्यात आलं.

  प्योंगयांग, 5 नोव्हेंबर : उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उन (Kim Jong Un) यांचा क्रूर चेहरा पुन्हा एकदा सर्वांसमोर आला आहे. कोरोना व्हायरसच्या (CoronaVirus) प्रतिबंधासाठी करण्यात आलेल्या नियमांचं एका व्यक्तीने उल्लंघन केल्याने, त्याला सर्वांसमोर उघडपणे गोळी घालण्यात आली आहे. एवढंच नाही, तर लोकांना घाबरवण्यासाठी उत्तर कोरियाने (North Korea) चीन सीमेवर एन्टी एयरक्राफ्ट बंदुकाही तयार ठेवल्या आहेत, आणि नियम तोडणाऱ्यांना पाहताच क्षणी गोळी मारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हुकुमशाहच्या या कृत्यांमुळे लोकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. रेडियो फ्री एशियाच्या हवाल्याने डेली मेलने दिलेल्या रिपोर्टनुसार, 28 नोव्हेंबर रोजी उत्तर कोरियाच्या सेनेने हुकुमशाह किम जोंग उन यांच्या आदेशानंतर एका व्यक्तीला सार्वजनिकरित्या गोळ्या झाडल्या. गोळ्या झाडण्यात आलेला व्यक्ती, कोरोना काळातील नियम मोडून चीनमधून सामानाची तस्करी करताना आढळला होता. दरम्यान, कोरोनाच्या भीतीने किमने आपल्या सर्व सीमा मार्च महिन्यापासून अधिकृतपणे बंद केल्या आहेत. अवैधपणे कुठेही जाणाऱ्या-येणाऱ्या लोकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी, त्या व्यक्तीला थेट गोळ्या घालण्याचं पाऊल उचलण्यात आलं.

  (वाचा - कबूल है..., हजार किलोमीटर दूर राहून केलं लग्न, कोरोना काळातील अनोखं Wedding)

  रिपोर्टनुसार, उत्तर कोरियाने कोरोना व्हायरसच्या केसेस कितीही नाकारल्या, तरी तेथील परिस्थिती चांगली नसल्याची माहिती आहे. हुकुमशाह किम जोंग उन कोरोना परिस्थिती घाबरले आहेत. सीमावर्ती भागातील रहिवाशांना धमकावण्यासाठीच, नियम मोडणाऱ्याला गोळ्या घालण्यात आल्या आहेत. किम जोंग उन यांना असा संशय आहे की, चीनच्या सीमेवरील लोक दुसऱ्या लोकांशी अधिक संपर्कात आहेत. काही लोक तस्करीतही सामील आहेत. त्यामुळे अशा लोकांमुळे कोरोनाचा प्रसार होऊ शकतो, असं त्यांचं म्हणणं आहे. नियम मोडणाऱ्या मृताचं वय 50 वर्ष असल्याचं बोललं जात आहे. तो व्यक्ती आपल्या चीनी साथीदारांसोबत गेल्या अनेक महिन्यांपासून सीमेपार तस्करी करत होता. चीन हा उत्तर कोरियाचा सर्वात मोठा व्यापारिक भागीदार आहे, परंतु कोरोना काळात दोन्ही देशातील व्यापरांत 75 टक्क्यांची घसरण झाली आहे. उत्तर कोरियाच्या बॉर्डर गार्ड्सवरही तस्करीत सामिल होण्याचे आरोप आहेत. त्यामुळे किम जोंग यांनी आपल्या सेनेतील विशेष तुकड्यांना बॉर्डर भागात तैनात केलं आहे, जेणेकरून बॉर्डर गार्ड्स तस्करीत सामिल आहेत की नाही, याचा तपास लावला जाऊ शकेल.

  (वाचा - 27 वर्षांपूर्वी गोठवून ठेवलेल्या भ्रूणातून दिला चिमुरडीला जन्म)

  उत्तर कोरियाच्या या दाव्यावर कोणाचाच विश्वास नाही - उत्तर कोरियाने अधिकृतपणे, त्यांच्या देशात आजपर्यंत एकही कोरोना व्हायरसचा रुग्ण नसल्याचा दावा केला आहे. परंतु जगाला किम यांच्या या दाव्यावर विश्वास नाही. उत्तर कोरियामध्ये कठोर सेन्सॉरशिरमुळे योग्य माहिती मिळवणं अशक्य होतं, त्यामुळे तिथे नेमकं काय सुरू आहे, याची माहिती घेणं अतिशय कठिण ठरतं. परंतु ज्याप्रमाणे जी काही माहिती समोर येत आहे, त्याद्वारे तेथील परिस्थिती चांगली नसल्याचा अंदाज अनेकांकडून वर्तवण्यात येत आहे.
  Published by:Karishma Bhurke
  First published:

  Tags: Coronavirus, Kim jong un, North korea

  पुढील बातम्या