मुंबई, 7 जून : उत्तर कोरियाचा (North Korea) हुकूमशहा किम जोंग उन (Kim Jong Un0) याने नुकताच एक विचित्र कायदा आणला आहे. यामध्ये उत्तर कोरियातील विदेशी पगडा नष्ट करण्याचा निर्धार त्याने केला आहे. या कायद्यानुसार विदेशी चित्रपट, कपडे आणि अयोग्य भाषेचा वापर केला तर मृत्यूदंडाची तरतूद करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी एका नागरिक दक्षिण कोरियन सिनेमासह सापडला म्हणून त्याला किमने मृत्यूदंडाची शिक्षा दिली होती.
यून मिन त्यावेळी फक्त 11 वर्षांची होती. त्यावेळी उत्तर कोरियन व्यक्तीला मृत्यूची शिक्षा देण्यात आली. त्याच्या शेजारच्या व्यक्तींना मृत्यूची प्रक्रिया पूर्ण बघण्याचा आदेश देण्यात आला होता. तुम्ही ती पाहिली नाही तर त्याला राजद्रोह समजले जाईल असे स्पष्ट करण्यात आले होते. अश्लील व्हिडीओची तस्करी करणाऱ्या व्यक्तींना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात येऊ शकते असेही उत्तर कोरियन सैनिकांच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.
या प्रकरणावर सो या उत्तर कोरियन नागरिकाने बीबीसीशी बोलताना सांगितले की, "तो माझ्यासाठी वेदनादायी अनुभव होता. माझे डोळे भरुन आले होते. उत्तर कोरियम सैनिकांनी त्या व्यक्तीला गोळी मारली. ज्या देशात सातत्यानं लॉकडाऊन लावण्यात येतो. इंटरनेट, सोशल मीडिया नाही. काही सरकारी टीव्ही चॅनेल्सवर देशातील नेत्याला जे ऐकायचे आहे तेच सांगितले जाते. तेथील परिस्थिती काय असेल, याची कल्पना करा."
किम जोंग सरकारने नवा कायदा केला असून यामध्ये दक्षिण कोरिया आणि जपानमधील माध्यमांच्या साहित्यास जे व्यक्ती पकडले जातील त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात येईल. त्याचबरोबर जे लोकं हे पाहताना पकडले जातील त्यांना 15 वर्षांची शिक्षा करण्यात येणार आहे.
प्रत्यार्पण टाळण्यासाठी मेहुल चोक्सीनं स्वतःच रचला अपहरणाचा कट
उत्तर कोरियातील तरुणांमध्ये विदेशी भाषा, हेअर स्टाईल आणि कपड्यांचा प्रसार रोखण्यासाठी किम सरकारची ही धडपड सुरु आहे. हे सर्व भंयकर विष असल्याचे त्याने सांगितले आहे. पॉप स्टार्स सारखे केस कमी करणाऱ्या मुलांची किम सरकारनं विशेष कॅम्पमध्ये रवानगी केल्याची माहिती दक्षिण कोरियातील एका वृत्तपत्राने दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kim jong un, North korea, World news