प्याँगयांग, 23 ऑक्टोबर : संपूर्ण जगात कोरोनानं थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. मात्र यातही उत्तर कोरियानं (North Korea) असा दावा केला आहे की, त्यांच्यात देशात एकही कोरोना रुग्ण नाही आहे. मात्र एक वेगळीच भीती उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन यांना आहे. चीनमधून धूळीतून प्राणघातक वायू उत्तर कोरियात येत असल्याचा दाव करण्यात आला आहे. एवढेच नाही तर हा 'प्राणघातक विषाणू' आणू शकेल अशी भीती उत्तर कोरियानं व्यक्त केली आहे. या भीतीमुळे उत्तर कोरियाने आपल्या लोकांना घरात राहण्यास सांगितले आहे.
बुधवारी, उत्तर कोरियाच्या राज्य माध्यमांनी 22 ऑक्टोबरपासून देशभरात पिवळ्या रंगाची धूळ येण्याता इशारा देत विशेष हवामान झोनविषयी माहिती प्रसारित केली. प्याँगयांगमधील रशियन दूतावासाने एका फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की डीपीआरकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने मुत्सद्दी मिशन व इतर आंतरराष्ट्रीय संस्थांना दिवसभर खिडक्या उघडण्यास टाळा, असा सल्ला दिला आहे.
वाचा-ट्रायलशिवायच भारतात दिली जाणार वादग्रस्त परदेशी लस, मोदी सरकारनं दिली परवानगी
दूतावासाने लिहिले, "हे उपाय, जसे आम्हाला सांगितले गेले होते की कोव्हिड-19 या पिवळ्या धुळीच्या कणांतून उत्तर कोरियामध्ये प्रवेश करू शकतो. दरम्यान, सूत्रांनी एनके न्यूजला पुष्टी दिली की प्योंगयांग गुरुवारी एकही नागरिक रस्त्यावर दिसला नाही.सुत्रांनी सांगितले की त्यादिवशी पाऊस न पडताही लोकांनी रेनकोट घातले.
वाचा-तुम्ही मास्क घालत नाही? मग कोरोनासोबत 'या' आजारालाही आमंत्रण देत आहात !
किम यांनी तयार केलं विध्वंसक अण्वस्त्र
उत्तर कोरियाने तयार केलेलं ह्वासोंग-16 आंतरखंडीय बॅलिस्टिक मिसाईल (Hwasong-16 intercontinental ballistic missile) सध्या चर्चेत आहे. हे मिसाईल जगातील सगळ्यात मोठं बॅलिस्टिक मिसाईल आहे असं सांगितलं जात आहे. क्षणार्धात संपूर्ण न्यूयॉर्क शहर बेचिराख करण्याची ताकद या अण्वस्त्रधारी मिसाईलमध्ये आहे. वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार हे जगातली सगळ्यात मोठं मोबाईल न्यूक्लिअर मिसाईल (Nuclear Missile) आहे. जे काही क्षणांत अमेरिकेच्या मोठ्या शहरांना बेचिराख करू शकतं. तसंच हे मिसाईल एकाच हल्ल्यात लाखो लोकांना मरणाच्या दारात नेऊ शकतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Kim jong un