किम जोंग उन यांच्या देशानं तयार केलं विध्वंसक अण्वस्त्र; क्षणार्धात संपूर्ण न्यूयॉर्क बेचिराख करण्याची ताकद

किम जोंग उन यांच्या देशानं तयार केलं विध्वंसक अण्वस्त्र; क्षणार्धात संपूर्ण न्यूयॉर्क बेचिराख करण्याची ताकद

जगाचं लक्ष पहिल्यांदाच उत्तर कोरियाने तयार केलेल्या Hwasong-16 intercontinental ballistic missile कडे गेलं आहे. हे जगातलं सगळ्यात बलाढ्य क्षेपणास्त्र असल्याचं सांगितलं जात आहे

  • Share this:

प्योंगयांग (उत्तर कोरिया), 14 ऑक्टोबर : उत्तर कोरियाचे (North Korea) सर्वेसर्वा किम जोंग उन (Kim Jong Un) यांच्याबाबतचं एक दुर्मीळ दृश्य नुकतंच जगाने पाहिलं. मिलिट्री परेडमध्ये आपल्या देशातील लोकांची जाहीरपणे माफी मागताना दिसले. पण आता या VIDEO (Kim Jong Un video) सोबतच आणखी एक विषय चर्चेत आला आहे. पहिल्यांदाच साऱ्या जगाचे लक्ष गेलं त्याकडे गेलं आहे. हा विषय आहे उत्तर कोरियाने तयार केलेलं ह्वासोंग-16 आंतरखंडीय बॅलिस्टिक मिसाईल.  (Hwasong-16 intercontinental ballistic missile) हे मिसाईल जगातील सगळ्यात मोठं बॅलिस्टिक मिसाईल आहे असं सांगितलं जात आहे. क्षणार्धात संपूर्ण न्यूयॉर्क शहर बेचिराख करण्याची ताकद या अण्वस्त्रधारी मिसाईलमध्ये आहे.

वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार हे जगातली सगळ्यात मोठं मोबाईल न्यूक्लिअर मिसाईल (Nuclear Missile) आहे. जे काही क्षणांत अमेरिकेच्या मोठ्या शहरांना बेचिराख करू शकतं. तसंच हे मिसाईल एकाच हल्ल्यात लाखो लोकांना मरणाच्या दारात नेऊ शकतं.

NUKEMAP च्या माहितीनुसार जर किम जोंग उन यांनी हे मिसाईल वापरून न्यूयॉर्क शहरावर निशाणा साधला तर काही क्षणांतच 64 लाख लोक मारले जातील किंवा पुढच्या काही आठवड्यांमध्ये तेवढेच लोक किरणोत्सर्गाने (Radiation) होणाऱ्या आजारांना बळी पडतील.

हे मिसाईलला नष्ट करणं कठीण

वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार या 'मॉन्स्टर' आंतरखंडीय बॅलिस्टिक मिसाईल (ICBM) चा शोध घेणं आणि नष्ट करणं खूपच कठीण जाणार आहे. तसंच मिसाईलविरोधी प्रतिकार रोखण्यासाठी डेकॉय हल्ला करण्यास सुद्धा हे मिसाईल सक्षम आहे. वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार हे जगातलं सर्वांत मोठं रोड-मोबाईल, लिक्विड फ्युएल मिसाईल आहे.

सत्ताधारी कामगार पक्षाच्या 75 व्या स्थापनादिनानिमित्त राजधानी प्योंगयांगमध्ये आयोजित संचलनात किम जोंग उनसमोर ह्वासोंग-16 बॅलिस्टिक मिसाईल आणण्यात आलं. हे मिसाईल इतकं मोठं आहे की त्याला 11 अॅक्सेलच्या वाहनावर ठेऊन या परेडमध्ये आणण्यात आलं.

अमेरिकेच्या धोक्यात वाढ

ओपन न्यूक्लियर नेटवर्कचे विश्लेषक शू टियारन यांच्या म्हणण्यानुसार हे मिसाईल डीपीआरकेच्या मागील आयसीबीएमपेक्षा मोठं आहे. या प्रकल्पामुळे अमेरिकेसाठी धोक्याची पातळी वाढली आहे.

उत्तर कोरियाच्या विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार हे शस्त्र पूर्वीच्या मिसाईलपेक्षा खूप मोठे आहे. ज्यात ह्वासोंग-15 चा समावेश आहे. हे मिसाईल अमेरिकेच्या पश्मिम किनारपट्टीवर जाण्यास सक्षम होतं. त्यांचं असंही म्हणणं आहे की नवीन मिसाईल हे जगातील सर्वांत मोठं मोबाईल आयसीबीएम मानलं जात आहे.

अमेरिकी पेसमेकरपेक्षा पाच मीटर मोठं 

शस्त्राच्या आकाराविषयी सांगायचं झालं तर ते 26 मीटर उंच आहे‌. जे रशियाच्या सतन मिसाईल नंतर दुसऱ्या स्थानावर आहे. आणि अमेरिकन पेसमेकर मिसाईलपेक्षा पाच मीटरनी मोठं आहे.

असे मानले जाते की ते अनेक वारहेड वाहून नेऊ शकतं. हे मिसाईल 2,000 मेगाटन इतका दाब निर्माण करू शकतं ज्या दाबाने कुठलंही शहर काही सेकंदांत नष्ट होईल.

उत्तर कोरियाचं नवीन मिसाईल आहे सोव्हिएत मिसाईल पेक्षा जास्त सक्षम

आंतरराष्ट्रीय अभ्यास संस्थेचे अणु प्रसार आणि अणु धोरणांचे संचालक मायकल एलेमॅन यांच्या अंदाजानुसार हे नवीन मिसाईल 2,000- 3,500 किलोग्रॅम वजनासहित अमेरिकेच्या हद्दीत कोणत्याही क्षमतेपर्यंत पोहचू शकेल. सोव्हिएत मिसाईलच्या तुलनेत हे अधिकच मोठं मिसाईल आहे.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: October 14, 2020, 10:01 PM IST

ताज्या बातम्या