15 सप्टेंबर : उत्तर कोरियानं पुन्हा एकदा आगळीक केलीय. उत्तर कोरियानं जपानवरून क्षेपणास्त्र डागलंय. हे क्षेपणास्त्र जपानच्या भूमीवरून जात प्रशांत महासागरात पडलंय. जवळपास ३७०० किलोमीटरचा प्रवास या क्षेपणास्त्रानं केला.
उत्तर कोरियानं असं धाडस दुसऱ्यांदा केलंय. गेल्या महिन्यातही उत्तर कोरियानं जपानवरून क्षेपणास्त्र डागलं होतं. उत्तर कोरियानं सहावी अणुचाचणी घेतल्यानंतर संयुक्त राष्ट्रांनी त्याच्यावर नवे निर्बंध घातले होते. त्यानंतर उत्तर कोरियानं केलेली ही नवी आगळीक आहे. चीन आणि रशियानं उत्तर कोरियाच्या मुसक्या आवळाव्यात, असं आवाहन अमेरिकेनं केलंय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Japan, Missile, North Korea, उत्तर कोरिया, क्षेपणास्त्र, जपान