डोनाल्ड ट्रम्प आणि किम जोंग यांना मिळणार शांततेचा नोबेल? शुक्रवारी होणार घोषणा

News18 Lokmat | Updated On: Oct 4, 2018 06:26 AM IST

डोनाल्ड ट्रम्प आणि किम जोंग यांना मिळणार शांततेचा नोबेल? शुक्रवारी होणार घोषणा

जगातला सर्वाधिक प्रतिष्ठेचा समजला जाणारा शांततेचा नोबेल पुरस्कार शुक्रवारी म्हणजे 5 ऑक्टोबरला घोषीत होणार आहे. नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं या पुरस्काराची घोषणा होईल. यावर्षी सर्वाधिक चर्चा आहे ती उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून-जेइ-इन यांची. अमेरिका आणि उत्तर कोरिया चर्चेसाठी एकत्र आल्याने इतिहास घडला आणि जगावरचं युद्धाचं संकट टळलं.

ट्रम्प आणि किम जोंग उन यांच्याशीवाय इथिओपीया आणि एरीट्रीया यांच्यामध्ये शांतता प्रक्रियेची सुरूवात करण्यास पुढाकार घेणारे नेते, कोलंबियात सरकार आणि विद्रोह्यांमध्ये शांतीकरार घडवून आणणारे मध्यस्त यांच्या नावाचीही जोरदार चर्चा आहे. पण यात आघाडीवर किम आणि ट्रम्प हेच आहेत. पण त्यांच्या नावांना होणारा विरोधही तेवढाच मोठा आहे. इथिओपीयाचे पंतप्रधान अबी अहमद यांचही नाव पुरस्कारासाठी चर्चेत आहे.

पुरस्कार निवडीसाठी स्वीडिश समिती असून त्यात पाच जणांचा समावेश आहे. नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं या पुरस्कारांची घोषणा होईल. समितीकडे यावर्षी जगभरातून 331 नामांकनं आली आहेत. त्यात व्यक्ती आणि संघटनांचा समावेश आहे. ही समिती या सर्व नामांकनांचा काटेकोरपणे अभ्यास करते, चर्चा करते आणि नंतर नावांची घोषणा केली जाते.

1901 पासून शांततेचं नोबेल पारितोषिक द्यायला सुरवात झाली. समितीकडे आलेल्या नामांकनांबाबत अतिशय गुप्तता पाळली जाते. असं असलं तरी अनेकदा समितीने निवडलेल्या नावांबाबत वाद निर्माण झाले आहेत. तसच अनेकदा विविध आरोपही झालेत. असं असलं तरीही या पुरस्काराची प्रतिष्ठा कमी झालेली नाही. गेल्या 70 वर्षात यावर्षी पहिल्यांदाच साहित्याच्या नोबेल पुरस्कारांची घोषणा स्थगित करण्यात आली आहे.

यावर्षी 12 जून 2018 ला जगाने इतिहास बघितला. जे कधीच शक्य वाटत नव्हतं ते शक्य झालं. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन यांची सिंगापूरमध्ये भेट झाली आणि जगावरचं युद्धाचं मोठं संकट टळलं. 70 वर्षांचं हाडवैर विसरून हे दोनही देश पहिल्यांदाच चर्चेच्या टेबलवर एकत्र आले.

Loading...

या चर्चेत किम जोंग उन यांनी नमतं घेत आपल्या देशातल्या अणुभट्ट्या बंद करण्याचं आश्वासन ट्रम्प यांना दिलं आणि नंतर ते पाळलही. तर ट्रम्प यांनी आपण किम जोंग उन यांच्या प्रेमात पडलो असं जाहीरपणे सांगत त्यांचं कौतुक केलं. या भेटीच्या दोन महिने आधीपर्यंत दोन्ही नेत्यांनी एकमेकांना शिव्यांची लाखोळी वाहिली आणि हल्ल्यांची धमकीही दिली होती.

त्या आधी किम जोंग उन आपल्या दुसरा शत्रू आणि सख्खा शेजारी असलेल्या दक्षिण कोरियातही गेला होता. कोरियाच्या विभाजनानंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांच्या सर्वोच्च नेत्यांनी एवढ्या शांततेत चर्चे केली होती. या घटनांमुळं जगातला तणाव कमी झाला आणि मोठा अनर्थ टळल्याची प्रतिक्रिया जगभरातून व्यक्त होत होती. त्यामुळं यावर्षीचा नोबेल कुणाला मिळतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 4, 2018 06:26 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...