Home /News /videsh /

NOBEL PEACE Prize 2020 : डोनल्ड ट्रम्प आणि त्यांची विरोधक कार्यकर्ती दोघांनाही सोडून तिसऱ्यालाच मिळालं शांततेचं नोबेल

NOBEL PEACE Prize 2020 : डोनल्ड ट्रम्प आणि त्यांची विरोधक कार्यकर्ती दोघांनाही सोडून तिसऱ्यालाच मिळालं शांततेचं नोबेल

साऱ्या जगाचं लक्ष असलेला नोबेल शांतता पुरस्कार (Nobel Peace Prize 2020 ) कोणाला मिळणार हे जाहीर झालं आहे.

    ऑस्लो, 9 ऑक्टोबर : साऱ्या जगाचं लक्ष असलेला नोबेल शांतता पुरस्कार (Nobel Peace Prize 2020 ) कोणाला मिळणार हे जाहीर झालं आहे. जागतिक सन्मानाचे पुरस्कार नॉर्वेच्या नोबेल समितीने जाहीर केले आणि कोणालच अपेक्षित असलेल्या यादीत नसलेल्या नावावर शांतता पुरस्काराची मोहोर उमटली गेली. संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक अन्न कार्यक्रमाला (UN  Word Food Programme ) यंदाचं शांततेचं नोबेल मिळणार आहे. नोबेल शांतता पुरस्कारासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald trump), रशियाचे अध्यक्ष पुतिन यांचीही नावं होती. त्याचप्रमाणे डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारख्या राजकारण्यांना पर्यावरणविरोधी म्हणून टीका करणारी तरुण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग (greta thunberg ) हिचंही नाव शांततेच्या नोबेलसाठी चर्चेत होतं. पण ही सगळी नावं डावलून जगभरातल्या कुपोषितांना अन्न मिळावं, आरोग्यपूर्ण अन्न मिळावं यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या वर्ल्ड फूड प्रोग्रॅमला आता हा प्रतिष्ठेचा सन्मान मिळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. वर्ल्ड फूड प्रोग्रॅमला हा मानाचा पुरस्कार जाहीर करून नॉर्वेच्या नोबेल कमिटीने मोठं भाष्य केलं आहे. साऱ्या जगाचं लक्ष भूकबळींसारख्या भयंकर वास्तवाकडे वळण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. जगभरात दरवर्षी लाखो लोक पुरेसं आणि योग्य अन्न न मिळाल्याने कुपोषित राहतात, काही जण अन्नावाचून प्राणही सोडतात. संपूर्ण मानव जातीला शरमेने मान खाली घालायला लावणारी ही समस्या आहे.  अन्नसुरक्षेसाठी झटणाऱ्या जागतिक कार्यक्रमाला नोबेलने सन्मानित केल्यामुळे जगाचं लक्ष या समस्येकडे वळवण्याचा नोबेल कमिटीचा प्रयत्न आहे.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    पुढील बातम्या